लोकनेता न्यूज नेटवर्क
आर्णी (अनिकेत खारोळ) :- दत्तनगर, आर्णी येथील मानवता मंदिराचे अध्यक्ष तसेच यवतमाळ जिल्हा प्रचार प्रमुख दत्तात्रय मार्कंड यांना गुरुकुंज मोझरी आश्रमाकडून ‘ग्रामगीताचार्य’ ही मानाची पदवी प्रदान करण्यात आली.
अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळ, गुरुकुंज आश्रम मोझरी यांच्या वतीने घेतलेल्या ग्रामगीता जीवन विकास परीक्षा मध्ये त्यांनी उत्तम गुण प्राप्त केले. त्यामुळे १० ऑक्टोबर रोजी मोझरी आश्रम येथे आयोजित कार्यक्रमात आश्रमाचे सर्वाधिकार लक्ष्मण गमे, संचालक मंडळाच्या अध्यक्षा पुष्पाताई बोंडे, परीक्षा विभागाचे अध्यक्ष गुलाब खवसे, सचिव गोपालदादा कडू व इतर मान्यवरांच्या हस्ते दत्तात्रय मार्कंड यांना सन्मानपत्र, मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन ‘ग्रामगीताचार्य’ पदवी प्रदान करण्यात आली.या प्रसंगी त्यांनी आपल्या यशाचे श्रेय मार्गदर्शक डॉ. ताराचंदजी कंठाळे, गुलाब महाराज खवसे आणि गोपाल कडू यांना दिले.दत्तात्रय मार्कंड यांना ‘ग्रामगीताचार्य’ पदवी प्राप्त झाल्याबद्दल आर्णी येथील मानवता मंदिरात तालुक्यातील गुरुदेव सेवा मंडळाच्या वतीने त्यांचा सामूहिक सत्कार करण्यात आला. या वेळी यादवराव पिंगळे, नंदकिशोर देठे, श्याम खडके, गणेश वानखेडे, राजेश श्रीवास, रोहिदास जाधव, मारोती पिलवण, गोविंद श्रीनाथ, नरेंद्र दैवल्य, बाबुलाल राठोड, तुळशीराम भायमारे, शिवदास परळीकर, विष्णू सावंत, गणेश कदम, पत्रकार राजू इंगोले, बाळू मुसळे, संजय घंगाळे, राजू सोनकुसरे, भास्कर कुंडकर, प्रकाश राठोड, दत्ता आडे, दीपक काळे, पांडुरंग दारोकर, सुभाष रेकलवार, अनिल साखरकर, सुभाष बनकर, धरमसिंग मुंडावरे, दत्ता ढोके, रमेश पवार, विजय खाडे, इंगळे सर, महादेव लोंढे, महादेव टेकाम यांच्यासह अनेक गुरुदेव भक्त उपस्थित होते.
कार्यक्रमानंतर उपस्थित मान्यवरांनी दत्तात्रय मार्कंड यांचे अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
------------------------------------------
🪀 सर्व महत्त्वाच्या बातम्या मिळवा WhatsApp वर लोकनेता न्यूज ला जॉईन व्हा व शेअर करायला विसरू नका👉 https://lokneta.in/

Post a Comment