लोकनेता न्युज नेटवर्क
कोल्हापूर (भगवान निगवेकर) :- कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध संस्था कर्मचारी संघटना, कोल्हापूर यांच्या मार्फत सभासदांना विविध सुविधा देण्यात येत आहेत. संघटनेतर्फे सेवानिवृत्ती मदत निधी योजना राबविण्यात येत असून, सेवाकालानुसार मदतीचे प्रमाण निश्चित करण्यात आले आहे.
सेवा कालावधी व मदत:
1 ते 5 वर्षे – काहीही नाही
6 ते 10 वर्षे – आहेर फक्त
11 ते 15 वर्षे – ₹5,000 व आहेर
16 ते 20 वर्षे – ₹10,000 व आहेर
21 वर्षांपेक्षा जास्त – ₹15,000 व आहेर
नैसर्गिक मृत्यू झाल्यास ₹40,000 तर अपघाती मृत्यू झाल्यास ₹1,00,000 इतकी मदत देण्यात येते. दोन अवयव कायम अपंग झाल्यास ₹80,000, तर एका अवयवाच्या अपंगत्वास ₹40,000 इतकी मदत दिली जाते.
तसेच काही मेजर ऑपरेशनसाठीही मदत निधी उपलब्ध असून, त्यामध्ये लकवा, अपेंडिक्स, एक डोळा, मणक्याचे ऑपरेशन, हात-पाय ऑपरेशन, गर्भाशय, हर्निया, हृदय, कॅन्सर, अल्सर, पित्ताशय, किडनी स्टोन, मेंदू ऑपरेशन, किडनी ट्रान्सप्लांट इत्यादी उपचारांचा समावेश आहे. फक्त या प्रस्तावा सोबत संस्था ठरावाची प्रत आवश्यक आहे अशी माहिती
संघटनेचे अध्यक्ष केरबा दत्तात्रय पाटील, उपाध्यक्ष श्यामराव शिवराम पाटील, जनरल सेक्रेटरी विश्वास शामराव पाटील आणि खजिनदार सुरेश गुंडा जाधव यांनी ही माहिती दिली.
------------------------------------------
🪀 सर्व महत्त्वाच्या बातम्या मिळवा WhatsApp वर लोकनेता न्यूज ला जॉईन व्हा व शेअर करायला विसरू नका👉 https://lokneta.in/

Post a Comment