लोकनेता न्यूज नेटवर्क
सेनगाव( महादेव हरण) :- कोळसा - विद्याशक्ती शिक्षण प्रसारक मंडळ, कोळसा येथे सेनगाव पोलीस स्टेशनच्या वतीने सायबर सुरक्षा सप्ताह या विषयावर महत्त्वपूर्ण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात सायबर सुरक्षेबाबत जागरूकता निर्माण करण्यावर भर देण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्याशक्ती शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्री. भास्करराव बेंगाळ साहेब होते. प्रमुख पाहुणे म्हणून सेनगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. दिपक मस्के साहेब तसेच पोलीस कॉन्स्टेबल श्री जाधव साहेब,श्री क्षिरसागर साहेब, संस्थेचे सचिव श्री अंकुशराव बेंगाळ,उपाध्यक्षा आनंदीताई बेंगाळ, प्राचार्य अभिषेक भैय्या बेंगाळ,मुख्याध्यापक श्री शिंदे सर,श्री सरकटे सर, पर्यवेक्षक श्री कसाब सर उपस्थित होते.
सायबर सुरक्षा विषयावर बोलताना श्री. दिपक मस्के साहेब म्हणाले की, ऑनलाइन गुन्हेगारी आणि आर्थिक गुन्हेगारी वाढत आहे. अशा परिस्थितीत आपली कुणीतरी अज्ञात व्यक्ती फसवणूक करत असेल तर महाराष्ट्र शासनाच्या टोल फ्री क्रमांक १९३० व केंद्र शासनाचा टोल फ्री क्रमांक १९४५ या क्रमांकावर कॉल करून तक्रार करू शकता. तसेच सायबर गुन्हेगारी अंतर्गत जर कोणी आपली फसवणूक केली असेल तर तुम्ही पोलीस प्रशासनाचा टोल फ्री क्रमांक ११२ वर कॉल करून आपली तक्रार नोंदवू शकता.
श्री. मस्के साहेबांनी विद्यार्थ्यांना मोबाईलचा योग्य वापर करण्याचे आवाहन केले. त्यांनी सांगितले की, मोबाईल वर येणाऱ्या कोणत्याही अनावश्यक लिंकला क्लिक करू नका. कोणत्याही ऑनलाईन आमिषाला बळी पडू नका कारण कोणीही फुकट पैसे देत नाही.
यावेळी अध्यक्षीय समारोपामध्ये श्री. भास्करराव बेंगाळ साहेबांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, तुम्ही उच्च शिक्षण घेतले पण गुन्हेगारी प्रवृत्तीकडे वळावे तर तुमच्या शिक्षणाचा काहीही उपयोग होणार नाही. त्यामुळे गुन्हेगारी प्रवृत्तीकडे वळू नका असे आवाहन साहेबांनी केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. शिंदे सर यांनी केले. या कार्यक्रमास सर्व कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.
------------------------------------------
🪀 सर्व महत्त्वाच्या बातम्या मिळवा WhatsApp वर लोकनेता न्यूज ला जॉईन व्हा व शेअर करायला विसरू नका👉 https://lokneta.in/

Post a Comment