लोकनेता न्युज नेटवर्क
उमरी (महेश पडोळे) :- कु.ऊ.बाजार समितीचे सभापती शिरीष देशमुख गोरठेकर आणि जिल्हा बँकेचे संचालक कैलास देशमुख गोरठेकर हे आपल्या हजारो कार्यकर्त्यांसह उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) मध्ये जाहीर प्रवेश केला आहे.
गेल्या अनेक दशकांपासून गोरठेकर परिवार जनतेच्या सेवेत अखंडपणे कार्यरत आहे. स्वर्गीय आमदार बाबासाहेब गोरठेकर आणि स्वर्गीय बापूसाहेब गोरठेकर यांनी उमरी, धर्माबाद, भोकर व नायगाव तालुक्यांच्या विकासासाठी मोठे प्रयत्न केले. यूपीपी कालवा, बाभळी बंधारा यांसारख्या प्रकल्पांच्या साकारण्यात त्यांचा मोलाचा वाटा राहिला.
गोरठेकर कुटुंबाची तिसरी पिढी आता अजितदादा पवार यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करीत आहेत या प्रवेशामुळे उमरी, धर्माबाद नगरपरिषद आणि जिल्हा परिषदेच्या आगामी स्थानिक पातळीवरील निवडणुकांमध्ये पक्षाला नवी ताकद आणि दिशा मिळेल.बाबळी बंधाऱ्याचे पाणी ऐण वेळेला शेजारच्या राज्यात सोडण्यात येत व धर्माबाद पर्यंत सिंचनाच पाणी जात नाही, शेतकरी कष्टकऱ्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी बैठक लवकरच लाऊ, ऊसाला भाव योग्य मिळत नाही शिरिष भाऊंनी दहा विस शेतकरी माझ्याकडे पाठवावे ऊसाची लागवड कशी करावी विविध विषयांवर मार्गदर्शन करणार व शेतकर्यांनी जोड धंदा म्हणून दूध व्यवसाय करावा ४०/४५ लिटर दूध देणाऱ्या गाई म्हशी आणावं,तालुक्यातील शिरीष भाऊ कैलास देशमुख यांनी कोणतेही काम आणावें माझ्याकडे ति विविध क्षेत्रातील कामे करण्यास सहमत आहे, येणार्या नगर परिषद जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूकीत सर्वच्या सर्व सदस्य निवडून द्यावे दोघा भावांना पाठबळ द्यावं असे आवाहन करतो.पुढे बोलतांना उपमुख्यमंत्री पवार
म्हणाले, यंदा आतिवृष्टिच्या काळामध्ये
वळीराजाचे मोठे नुकसान झाले आहे.
शेतकऱ्यांसाठी आम्ही केंद्राची मदत
मागत आहोत. उद्या केंद्रिय गृहमंत्री
अमित शाहा मुबईला येत आहे. तसेच
पंतप्रधान नरेंद्र मोदी २९ तारखेला
मुंबईला येणार आहेत या दोन्ही नेत्यांनी,
तुम्ही पंचनामे करा आणि आमच्या
पाठवुन दया आम्ही आवश्यक ती
मदत देऊ असे आश्वासन दिले. पिक
कर्जाचे पुनर्गठन, शाळा महाविघालय
परिक्षा शूल्काला माफी, रोजगार हमी
योजनेच्या कामात शिथीलता, शेतीपंपांची वीज जोडणी खंडित न करणे.
आदीची मदत मिळणार आहे. तरयेथील
जनतेनी गोरठेकर घराण्यावर प्रेम केले.
सर्व सामान्य माणसाला केंद्र विदु मानुन
त्यांनी काम केले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
हा शिव छत्रपती फुले, शाहू आंबेडकर,
सावित्रीबाई फुलेंच्या विचारधारेने पुढे
चालेला आहे. उमरीला आल्यानंतर
मी शिवछत्रपती शिवाजी महाराजांच्या
पुतळ्याला नतमस्तक झालो ते आपल्या
सर्वार्च दैवत आहे. संत कवी दासगणू
महाराज यांच्या यांच्या पदस्पर्शाने
पावन झालेली कर्मभूमी असून कै.
वावासाहेब देशमुख गोरठेकर यांच्यासह
अनेक स्वातंत्र्यसैनिकांचा वारसा आज
तुम्हाला मिळालेला आहे. तुम्ही फार
भाग्यवान आहात. यापुढे ही राष्ट्रवादी पक्षाला साथ द्यावी असे आवाहन केले.
पवारांच्या भाषणा दरम्यान गोंधळ
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे
भाषण सुरू असताना, कर्जमाफी केव्हा
करणार असा सवाल एका शेतकऱ्याने
उपस्थित केला. तेव्हा पवार म्हणाले,
कर्जमाफी करणार असे सरकारने
सांगितले आहे. सध्या शेतकऱ्यांना
पुन्हा उभे करण्यासाठी पुनर्वसनासाठी
३२ हजार कोटी रुपये लागतील.
याअगोदर देशात सरकारने ७१ हजार
कोटी रुपये कर्जमाफी केली. आता
कर्ज माफी करायची की शेतकऱ्यांना
मदत करायची. लाडक्या बहिणीला
१५०० रुपये महिन्या प्रमाणे ४५ हजार
कोटी रुपये वर्षाला दयावे लागते, असे मा.अजितदादा पवार यांनी बोलताना सांगितले आहे.
या कार्यक्रमास माजी मंत्री नवाब मलिक, कार्यक्रमाचे अध्यक्ष आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर,जिल्हाध्यक्ष शिवराज पाटील होटाळकर,प्रदेश सरचिटणीस भाऊसाहेब गोरठेकर, नागनाथ घिसेवाड सुभाषराव देशमुख, गणेश गाढे पाटील दासराव देशमुख गोरठेकर,वंगलवार मामा, गोविंदराव मुक्कावार शिरुरकर, सुधाकर देशमुख धानोरकर, दिगंबर यलमगोंडे बालाजी जाधव बालाजी पंतोजी सर राजु पाटील ढगे सदाशिव पुपुलवाड, प्रविण भाऊ सारडा, गणेश अनेमवाड दिगांबर जगताप दतराम मुंगल,आकाश सैदमवार, खुशाल पाटील निमटेककर नागेश बट्टेवाड,आजि माजी तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती सदस्य व नगर परिषद नगरसेवक, सरपंच संघटना सदस्य कार्यकर्ते, हजारोंच्या संख्येने अजित पवार साहेब यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला आहे यावेळी मोठ्या प्रमाणात माता भगिनी पत्रकार बांधव, पोलिस प्रशासन प्रतिष्ठित नागरिक धर्माबाद उमरी नायगाव भोकर तालुक्यातील लाखों जनसमुदाय उपस्थित होता.
या भव्य दिव्य कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सदाशिव पुपुलवाड, गणेश पा गाढे यांनी केला आहे.
आभार प्रदर्शन शिरीष भाऊ देशमुख कैलास भाऊ देशमुख यांनी केला आहे.
------------------------------------------
🪀 सर्व महत्त्वाच्या बातम्या मिळवा WhatsApp वर लोकनेता न्यूज ला जॉईन व्हा व शेअर करायला विसरू नका👉 https://lokneta.in/

Post a Comment