एकलव्य इंडिया फाउंडेशन चा स्तुत्य उपक्रम, दहावी - बारावीच्या विध्यार्थ्यांकरिता बिबी येथे मार्गदर्शन सोहळ्याचे आयोजन. पालक व पाल्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन


लोकनेता न्यूज नेटवर्क

लोणार (प्रतिनिधी) :- लोणार तालुक्या अंतर्गत येणाऱ्या बीबी येथे एकलव्य इंडिया फाउंडेशन व वसंतराव नाईक कनिष्ठ महाविद्यालय, बिबी यांच्या संयुक्त विद्यमाने दहावी व बारावी च्या विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक/करिअर बद्दल मार्गदर्शन करण्यासाठी आनंद मंगल कार्यालय, बिबी येथे दि. २५/१०/२०२5 रोजी मार्गदर्शन सोहळा आयोजित करण्यात आला आहे. तसेच एकलव्य संस्थेच्या माध्यमातून उच्च शिक्षणासाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा व पालकांचा सत्कार या ठिकाणी करण्यात येणार आहे. 

पिंप्री खंदारे येथील राजु केंद्रे यांच्या मागील आठ वर्षांच्या संघर्षमय प्रयत्नातून २००० पेक्षा अधिक पहिल्या पिढीतील विद्यार्थी, ऐतिहासिकदृष्ट्या वंचित समुदायांमधून, भारत आणि परदेशातील १०० पेक्षा जास्त नामांकित विद्यापीठांमध्ये विविध शिष्यवृत्ती आणि फेलोशिप कार्यक्रमांच्या माध्यमांतून शिक्षण घेत आहेत, एकलव्याचे शेकडो विद्यार्थी शिक्षण घेऊन नोकरी व वेगवेगळ्या क्षेत्रात नेतृत्व करत आहेत. एकलव्यचा हा प्रवास केवळ विदर्भ आणि मराठवाड्यापर्यंत मर्यादित नसून २५ पेक्षा जास्त राज्यातील विद्यार्थीही एकलव्यच्या मार्गदर्शनात तयार होत आहेत. 

बुलढाणा जिल्हा व परिसरातील विदयार्थ्यांना पुढील शैक्षणिक संधी उपलब्ध करून देण्यासाठी एकलव्य व रामकृष्ण शिक्षण प्रसारक संस्था, बिबी चे अध्यक्ष मा. श्री. अभयदादा चव्हाण (मा. समाजकल्याण सभापती जि.प. बुलढाणा) यांनी सुद्धा परिसरातील विद्यार्थी व पालक यांना सदरील कार्यक्रमाला उपस्थित राहणे करिता आवाहन केले आहे. या मार्गदर्शन सोहळ्यास मा. श्री. सिद्धार्थजी खरात साहेब, आमदार मेहकर तसेच मा. श्री. विशाल नरवाडे IAS ( मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प. बुलढाणा), मा. श्री. संतोष खाडे Dysp (पोलीस उपअधिक्षक), श्री अभय जी चव्हाण (माजी समाज कल्याण सभापती बुलढाणा) राजू केंद्रे (संस्थापक अध्यक्ष एकलव्य इंडिया फाऊंडेशन) हे मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहणार आहे.

हा गौरव सोहळा म्हणजे या विद्यार्थ्यांचा सन्मान या मुलांच्या अभ्यासाचा, कष्टाचा, त्यागाचा आणि मेहनतीचा.... या तरुणांच्या पाठीवर कौतुकाची थाप देण्यासाठी आपण सर्व विद्यार्थी मित्रानी व पालकांनी या गौरव सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात येत आहे.

------------------------------------------

🪀 सर्व महत्त्वाच्या बातम्या मिळवा WhatsApp वर लोकनेता न्यूज ला जॉईन व्हा व शेअर करायला विसरू नका👉 https://lokneta.in/

0/Post a Comment/Comments