एक दिवा वंचितांसाठी ,पालावरची दिवाळी कुंडलवाडीत उत्साहात साजरी


लोकनेता न्यूज नेटवर्क

कुंडलवाडी (गंगाधर दुसलवाड) :- “एक दिवा वंचितांसाठी” या सामाजिक उपक्रमांतर्गत पालावर दिवाळी साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाला राज्यसभेचे लोकप्रिय खासदार मा. डॉ. अजित गोपछडे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

त्यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र भाई मोदी , महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्या विकासात्मक ध्येय धोरणाबद्दल लोकांना मार्गदर्शन केले , आणि मी नेहमी आपल्या सर्वांच्या पाठीशी आहे आणि भारतीय जनता पार्टी नेहमीच आपल्या सोबत आहे.

कार्यक्रमाचे आयोजक नगर परिषदेचे माजी उपाध्यक्ष आणि सध्याचे नगराध्यक्ष पदाचे प्रभावी दावेदार डॉ. विठ्ठलराव कुडमुलवार यांनी वडार समाजातील महिलांना साड्या आणि गोडधोड वितरित केले. तसेच बालकांना फटाके देऊन त्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलविला.

या उपक्रमास वडार समाजातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. दिवाळीचा आनंद सर्व समाजघटकांपर्यंत पोहोचविण्याचा हेतू या उपक्रमामागे असल्याचे आयोजकांनी सांगितले.

------------------------------------------

🪀 सर्व महत्त्वाच्या बातम्या मिळवा WhatsApp वर लोकनेता न्यूज ला जॉईन व्हा व शेअर करायला विसरू नका👉 https://lokneta.in/

0/Post a Comment/Comments