भाजपा पक्षाकडून बालाजी येलगंद्रे बडुर पंचायत समिती गणातून निवडणूक रिंगणात उतरण्यास इच्छुक


लोकनेता न्यूज नेटवर्क

बिलोली (प्र. नबाजी कुडकेकर) :- बिलोली तालुक्यातील मौजे दौलापुर येथील रहिवासी असलेले समाजशिल व्यक्तिमत्त्व बालाजी यलगंद्रे हे आगामी बडूर पंचायत समिती गणातुन निवडणूक रिंगणात भाजपा पक्षाच्या वतीने उतरणार असल्याचे संकेत त्यांच्या समर्थकांनी दिले आहेत.

बडूर पंचायत समिती गण राजकीय समीकरणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा मानला जातो, यावेळी सदरिल पंचायत समिती गण अनुसूचित जाती साठी राखीव असुन, बालाजी यलगंद्रे हे कोटग्याळ - दौलापुर गट ग्रामपंचायत सदस्य असुन, तरुण तडफदार कार्यकर्ता, आमदार रितेश अंतापुरकर यांचा विश्वासू कार्यकर्ता, अंत्यत प्रतिकुल परिस्थितीतून आर्थिक दृष्ट्या वंचित घटकांना सर्वांगीण विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी यलगंद्रे नेहमी कार्यतत्पर असतात. ग्रामीण भागातील धार्मिक , सांस्कृतिक, शैक्षणिक, सामाजिक आदी उपक्रमांना अग्रक्रम देत, बालाजी यलगंद्रे हे ग्रामीण तरुणाईच्या गळ्यातील ताईत बनले आहेत. त्यांच्या यशस्वी कार्याची दखल घेत भारतीय जनता पक्षाने पंचायत समिती सदस्य म्हणून बडूर गणातुन निवडणूक रिंगणात उतरवण्याची अधिकृत घोषणा करण्यात येणार आहेत.  

हा मतदारसंघ अनुसूचित जाती साठी अधिकृत घोषणा झाली असून या निर्णयामुळे गणातील राजकीय समीकरणांमध्ये हालचालींना वेग आला आहे.

बालाजी येलगंद्रे हे दौलापुर येथिल रहिवासी आहेत कोटग्याळ दौलापुर गट ग्राम पंचायत सदस्य आहेत उच्च शिक्षित समाजकारण, शैक्षणिक कार्य आणि ग्रामीण विकास क्षेत्रात सक्रिय आहेत. त्यांचा जनसंपर्क आणि विकासाभिमुख दृष्टिकोनामुळे स्थानिकांमध्ये विश्वास आणि लोकप्रियता मिळवली आहे. त्यांच्या नेतृत्वगुणांमुळे आणि कार्यकर्त्यांम.

------------------------------------------

🪀 सर्व महत्त्वाच्या बातम्या मिळवा WhatsApp वर लोकनेता न्यूज ला जॉईन व्हा व शेअर करायला विसरू नका👉 https://lokneta.in/

0/Post a Comment/Comments