‘अल्युमिनियम मॅन ऑफ इंडिया’ भरत गित्ते यांच्या Taural India, पुणे येथील कंपनीला आमदार मनोज कायंदे यांची भेट

लोकनेता  न्युज नेटवर्क

सिंडखेड राजा|प्रतिनिधी :-  उद्योगजगतात ‘अल्युमिनियम मॅन ऑफ इंडिया’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री भरत गिते यांच्या पुणे, Taural India कंपनीला सिंडखेड राजा चे आमदार श्री मनोज कायंदे यांनी भेट दिली.

         नंदागौळ सारख्या लहान गावातील शेतकरी कुटुंबातील मुलगा भरत गिते यांनी COEP, पुणे येथील प्रतिष्ठित कॉलेजमधून शिक्षण घेतले आणि नंतर जर्मनीमध्ये उच्च शिक्षण पूर्ण केले. अनेक संधी असूनही मायभूमीच्या सेवेच्या भावनेतून त्यांनी भारतात परत येऊन उद्योग सुरू केला. फक्त दहा कर्मचाऱ्यांसह सुरू केलेली कंपनी G&B Metal Casting आज Taural India या नावाने जागतिक स्तरावर ओळखली जाते. कंपनी अनेक देशांमध्ये निर्यात करते आणि शेकडो नवतरुणांना रोजगार देते.

            Taural India येथे भरत गिते यांची भेट घेताना आमदार श्री मनोज कायंदे यांनी त्यांच्या उद्योगातील यशस्वी वाटचालीबद्दल अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

             भरत गिते इतके साधे, नम्र आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व असलेले आहेत, जे भेटल्यावर मनोमन आनंद देणारे आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली Taural India भविष्यातील औद्योगिक विकासाच्या वाटचालीत आणखी प्रगती करेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

________________________

0/Post a Comment/Comments