निवडणूक जिल्हा परिषदेची; धावपळ इच्छुकांची तीनही सर्कल मध्ये लहान पार्डी (म) येळेगाव


लोकनेता न्युज नेटवर्क 

अर्धापूर (आनंदराव मोरे) :- अर्धापूर तालुक्यातील येळेगांव जिल्हा परिषद गटात निवडणुकीचे मैदान तापायला लागले असून इच्छुक उमेदवारांची धावपळ सुरू झाली आहे. या गटात कॉग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, वंचित बहुजन आघाडीसह राष्ट्र‌वादी काँग्रेस (शरद पवार) अशा विविध राजकीय पक्षांचे अनेक इच्छुक उमेदवार गुडघ्याला बाशिंग बांधून निवडणुकीच्या भोवल्यावर चढायला तयार झाले आहेत. तरीही येथे भाजप आणि शिवसेना (उबाठा) या दोन प्रमुख पक्षाचे वर्चस्व दिसून येते, त्यामुळे आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत भाजपचे 'कमळ' फुलणार, शिवसेना (उबाठा) ची मशाल पेटणार ? की कॉंग्रेसचा 'हात' दोघांचाही घात करणार? याची उत्सुकता जनतेला लागली आहे.

जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीची तारीख जाहीर झाली नसली तरी शासनस्तरावर निवडणूक प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. यात मतदान केंद्र, बुथ व्यवस्था, गट आणि गण प्रारुप आ राखडा आदी कार्यक्रम पुर्ण झाला असून दि. १३ ऑक्टोंबर रोजी आरक्षण सोडत झाल्यामुळे सर्व पदाधिकारी कार्यकर्तेची इच्छुकांची धावपळ पायाला मिळत आहे आणि गणाची आरक्षण सोडत झाल्यामुळे आहे. मात्र आरक्षण सोडतीच्या अगोदरच येळेगांव जिल्हा परिषद गट सर्वसाधारण महिला प्रवगार्साठी असल्याचे गृहीत धरून सर्वच राजकीय पक्षांचे इच्छुक

उमेदवार कामाला लागले आहेत. यात शिवसेना (उबाठा) गटाचे जिल्हा प्रमुख तथा माजी जिल्हा परिषद सदस्य बबनराव वारसे यांच्यासह भाजपचे कुषी उत्पन्न बाजार समिती सभापती संजयराव देशमुख लहानकर,भगवानराव पाटील तिडके, अशोक पाटील टेकाळे, भाजप तालुकाध्यक्ष बालाजी पाटील गव्हाणे, माजी सभापती शामराव पाटील टेकाळे, भाऊराव कारखान्याचे संचालक अॅड. सुभाषराव कल्याणकर, शंकरराव टेकाळे, माजी सभापती आनंदराव कपाटे नवनाथ कपाटे तर ओ. बी. सी. प्रवगार्तील गोविंद महाराज गोदरे, लिंगोजी चिंतले, अमोल डोंगरे, कॉग्रेसकडून ज्ञानेश्वर पाटील राजेगोरे, सदाशिव कपाटे, मदन देशमुख, स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून जिल्हाध्यक्ष हनुमंतराव राजेगोरे, संभाजी ब्रिगेडचे संतोष पाटील गव्हाणे, शिवसेना (उबाठा) चे संतोष कल्याणकर, माजी उपसभापती अशोक कपाटे, माजी पं. स. सदस्य बालाजी कल्याणकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष आत्माराम कपाटे, शिवसेनेचे संतोष कपाटे तर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षांचे आत्माराम राजेगोरे, वंचित बहुजन आघाडीचे , बंटी मोरे आदी इच्छुक उमेदवार निवडणुकीसाठी चाचपणी करित आहेत.

येळेगांव जिल्हा परिषद गट निर्माण झाल्यापासून आजपर्यंत या गटाने आलटून पालटून काँग्रेस आणि शिवसेनेचे उमेदवार निवडून दिलेले आहेत. सर्वप्रथम सन २००२ च्या जिल्हा परिषद निवडणुकीत कॉग्रेसचे प्रल्हाद सोळके त्यानंतर सन २००७च्या निवडणुकीत शिवसेनेचे रामराव भालेराव,

सन २०१२ च्या निवडणुकीत कॉग्रेसच्या वंदनाताई संजयराव देशमुख त्यानंतर सन २०१७ च्या निवडणुकीत शिवसेनेचे बबनराव बारसे विजयी झाले आहेत. यापुर्वी माजी मुख्यमंत्री खासदार अशोकराव चव्हाण हेच काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा होते, तरीही या जिल्हा परिषद गटात आलटून पालटून कॉग्रेस आणि

शिवसेना उमेदवार विजयी झाले आहेत. परंतु आज रोजी खासदार अशोकराव चव्हाण आपल्या सर्व समर्थकासह भाजपवाशी झाले असून आगामी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका खासदार अशोकराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीच्या कमळ निशाणीवर लढविल्या जाणार आहेत. शिवाय येथील आमदार अॅड. श्रीजया चव्हाण भारतीय जनता पार्टीच्या असल्यामुळे त्या भाजप उमेदवारांच्या विजयासाठी प्रतिष्ठा पणाला लावून विजयश्री खेचून आणण्याचा प्रयत करणार आहेत. मात्र येथील सुज्ञ मतदार भाजपचे 'कमळ' फुलविणार, शिवसेना (उबाठा) ची मशाल पेटणार की काँग्रेसच्या 'हाताला' साथ देणार? या प्रश्नाचे उत्तर प्रत्यक्ष वेळच देणार आहे.

शेवटची निवडणुक लढवणार : लहानकर

माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली मी गेली पस्तीस वर्षांपासून सक्रिय राजकारणात आहे. या कालावधीत जेव्हा जेव्हा खुल्या प्रवगार्साठी जागा असेल तेथे पक्षश्रेष्ठींनी लहानकर परिवाराला संधी दिलेली आहे. यापूर्वी साहेबराव देशमुख लहानकर आणि माझी पत्नी वंदना देशमुख लहानकर यांच्या रुपाने जिल्हा परिषदेत संधी मिळाली आहे. आगामी होवू घातलेल्या जिल्हा परिषद निवडणूकीसाठी अधार्पूर तालुक्यात कुठेही खुल्या प्रवगार्साठी जागा असेल तिथे मी निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक असून ही माझी शेवटची निवडणुक असेल. त्यानंवर मात्र खासदार अशोक राव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली पक्षाचा कार्यकर्ता म्हणून काम करणार आहे. अशी प्रतिक्रिया नदिड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संजयराव देशमुख लहानकर व भगवान तिकडे नवनाथ कपाटे यांनी ताकतीने निवडणूक लढविणार आहेत

------------------------------------------

🪀 सर्व महत्त्वाच्या बातम्या मिळवा WhatsApp वर लोकनेता न्यूज ला जॉईन व्हा व शेअर करायला विसरू नका👉 https://lokneta.in/

0/Post a Comment/Comments