निवडणूक निर्णय अधिकारी प्रा. संजय खडसे यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक अधिकारी व 3 पथकांचे प्रशिक्षण यशस्वी

लोकनेता न्यूज नेटवर्क

सिंदखेड राजा (ज्ञानेश्वर बुधवत) :- मा. राज्य निवडणूक आयोगाने नगर परिषद निवडणूक 2025 चा कार्यक्रम दि. 4 नोव्हेंबर 2025 ला जाहिर केला आहे, त्याअनुषंगाने आज दि. 11 नोव्हेंबर 2025 रोजी नगरपरिषद कार्यालय सिंदखेडराजा येथे SST, VST, FST पथकातील सर्व कर्मचारी यांची उपविभागीय अधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी प्रा. संजय खडसे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.

SST पथकातील सर्व कर्मचाऱ्यांनी वाहनाची तपासणी ही योग्यरीत्या करावी, तपासणी करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी सर्व वाहनांची नंबर लिहून घ्यावेत तसेच पोलीस कर्मचाऱ्यांनी बॅरिकेट लावून वाहनांची तपासणी योग्यरीत्या कशी पूर्ण होईल याकडे लक्ष द्यावे, अश्या प्रकारच्या सूचना प्रा. खडसे यांनी दिल्या.

FST पथकाने प्राप्त झालेल्या तक्रारींची तक्रार स्थळी जाऊन चौकशी करावी आणि योग्य ती कारवाई करण्याची सूचना सुद्धा प्रा. खडसे यांनी दिल्या आहेत. SST पथक हे दिनांक 11 नोव्हेंबर पासून कार्यान्वित होणार आहे तरी या पथकातील सर्व अधिकाऱ्यांनी / कर्मचाऱ्यांनी आपापली जबाबदारी योग्य प्रकारे पार पाडावी अशा सूचना त्यांना देण्यात आल्या.

सर्व झोनल अधिकाऱ्यांनी सर्व मतदान केंद्राची पाहणी करून घ्यावी, पाहणीवेळी काही मतदान केंद्र जर संवेदनशील आढळली तर तसा अहवाल तयार करून तो सादर करायच्या सूचना दिल्या आहेत. पोलीस अधिकाऱ्यांनी संवेदनशील भागातील मतदान केंद्राना सुरक्षा पुरवण्यासाठी ची योग्य ती कार्यवाही करावी याबद्दल प्रा. खडसे यांनी मार्गदर्शन केले.

प्रा. खडसे यांनी निवडणुकी संदर्भात काही मार्गदर्शक सूचना सर्व कर्मचाऱ्यांना सांगितल्या, तसेच नगर परिषद निवडणुकीला प्राधान्य देऊन सर्व प्रक्रिया यशस्वी रित्या पार पाडण्याचे आवाहन केले...

आजच्या सभेला तहसीलदार सिंदखेड राजा अजित दिवटे, मुख्याधिकारी तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. आशिष बोबडे, नायब तहसीलदार डॉ. प्रवीणकुमार वराडे तसेच सर्व अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

________________________

🪀सर्व महत्वाच्या अपडेट मिळवा Whatsapp वर नंबर सेव्ह करा व लोकनेता न्युज ला जॉईन व्हा 👉 https://join.lokneta.in

0/Post a Comment/Comments