लोकनेता न्युज नेटवर्क
कुंडलवाडी (गंगाधर दुसलवाड) :- पंचायत समिती शिक्षण विभाग बिलोली व मिलिंद विद्यालय व मिलिंद प्रा. शाळा कुंडलवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने मिलिंद विद्यालय व मिलिंद प्रा.शाळा कुंडलवाडी येथे आयोजित 53 व्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनामध्ये मिलिंद विद्यालय व मिलिंद प्राथमिक शाळेने घवघवीत यश संपादन केले. यामध्ये मिलिंद विद्यालयास माध्यमिक गटातून पहिले पारितोषिक तर मिलिंद प्राथमिक शाळेस प्राथमिक गटातून दुसरे पारितोषिक मिळाले.
आज आयोजित 53 व्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे उदघाटन गटशिक्षणाधिकारी .बी.एम.पाटील,गणित व विज्ञान अध्यापक मंडळाचे ता.अध्यक्ष सुभाष देगलूरकर , मिलिंद विद्यालयाचे मु.अ.एच.एन पांचाळ , मिलिंद प्रा शाळेचे प्रभारी मु.अ.सुभाष दरबस्तेवार यांच्या हस्ते करण्यात आले. या सोहळ्या वेळी गटसाधन केंद्र बिलोली चे विषय तज्ञ गुणवंत हलगरे ,सुरेश राठोड , केंद्रप्रमुख वाय.एस.कौठकर ,प्राथमिक व माध्यमिक विभागाचे सर्व शिक्षक, प्रदर्शनासाठी आलेले परीक्षक उपस्थित होते.
सर्व परीक्षणा अंती मिलिंद प्रा. शाळा कुंडलवाडी यांनी प्राथमिक गटातून द्वितीय क्रमांक पटकाविला. वर्ग सातवी सेमी च्या विद्यार्थीनी कु. रुद्राक्षी राहुल अर्जुने व कु.प्राची सुनील नरावाड यांनी प्रा.शाळेचे विज्ञान शिक्षक संभाजी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली मल्टीपर्पज स्टेशनरी बाईक हा अतिशय नाविन्यपूर्ण उपक्रम सादर केला. उपक्रम व उपक्रमाबद्दल असलेले विद्यार्थ्यांचे सखोल ज्ञान या बाबी परीक्षकांना आवडणाऱ्या ठरल्या. तर माध्यमिक गटातून मिलिंद विद्यालय कुंडलवाडी च्या प्रयोगाची प्रथम क्रमांकासाठी निवड करण्यात आली. या गटाने इमर्जिंग टेक्नॉलॉजी अँड परफ्यूम क्रिएशन हा अतिशय नाविन्यपूर्ण प्रयोग सादर केला. कुठल्याही रासायनिक पदार्थांचा उपयोग न करता वैज्ञानिक पद्धतीने नैसर्गिक सुगंध निर्मिती कशी करता येते याबाबत हा प्रयोग होता. अतिशय कमी खर्चामध्ये सर्वसाधारण साधनांचा वापर करून हा प्रयोग सादरीकरण केल्याने या प्रयोगाने परीक्षकांचे मन जिंकले. शिवाय प्रयोगाविषयी विचारले गेलेल्या विविध प्रश्नांची उत्तरे या प्रयोग सादरीकरणांमध्ये सहभागी वर्ग दहावी सेमी चे विद्यार्थी कु.रोशनी सोनकांबळे,आर्यन शारवाले, दत्तप्रसाद गंगुलवार यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने दिले.या प्रयोगासाठी विद्यालयातील विज्ञान शिक्षिका कु.सोनाली तुरे मॅडम व कु. सुजाता कौठकर मॅडम यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले
मिलिंद प्रा.शाळा व मिलिंद विद्यालयाने संपादित केलेल्या घवघवीत यशाबद्दल सर्वोदय शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष कुणाल लोहगावकर , मंडळाचे संचालक विजयकुमार लोहगावकर , मिलिंद प्रा.शाळेचे मुख्याध्यापक आर. डी. नरावाड सर, मिलिंद विद्यालयाचे मु.अ एच.एन पांचाळ सर तसेच मिलिंद प्रा.शा व मिलिंद विद्यालयाचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी कौतुक व अभिनंदन केले आहे.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एस.बी.हाळीखेडे,अमरदीप दगडे यांनी केले तर उपस्थितांचे आभार संतोष चंदनकर यांनी केले.
------------------------------------------
🪀 सर्व महत्त्वाच्या बातम्या मिळवा WhatsApp वर लोकनेता न्यूज ला जॉईन व्हा व शेअर करायला विसरू नका👉 https://lokneta.in/


Post a Comment