लोकनेता न्यूज नेटवर्क
देगलूर (जयपाल दावनगीरकर) :- देगलूर तालुक्यातील मरखेल पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या हाणेगाव परिसरातील मानूर गावात अवैद्यरित्या एका हॉटेलमध्ये जुगार चालू असताना त्या जुगार अड्ड्यावर नांदेडच्या स्थानिक गुन्हे शाखा पथकाने दिनांक 12 नोव्हेंबर रोज बुधवार या दिवशी मध्यरात्री 1 वाजताच्या सुमारास नांदेड स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक कोरे यांच्या पथकाने सापळा रचून जुगार खेळत असताना अब्दुल गफार, अलीम मकबूलसाब, माधव गुंडप्पा पल्लेवाड, मलप्पा म्याळे, शिदय्या शंकरप्पा कोळनूरे, हुशेन मुसासाब पिंजारी, संतूक कृष्णारेड्डी पंगे, नसीर सतारसाब पिंजारी, मन्नू किशन हे सर्व रा. मानूर यांच्या कडून रोख रक्कम 12 हजार 200 रूपये 6 मोटार सायकलीसह छापा टाकून 3 लाख 60 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून 9 जणांना ताब्यात घेऊन मरखेल पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
मानूर हा गाव तेलंगणा व कर्नाटक राज्याच्या सीमेवर असल्याने या दोन्ही राज्यातील जुगार व मटका शौकीनांनी या परिसरात मोठी गर्दी केली आहे. या अवैध धंद्याना चांगलाच ऊत आला आहे. जुगाराचे अड्डे हणेगाव परिसरात राजरोसपणे व खुलेआम चालू असल्याने अनेकांचे संसार उद्धवस्त झाले असून जुगार व मटका मालक मालामाल झाले आहेत.
मरखेल पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या मरखेल, हाणेगाव, माळेगांव, मानूर, येडूर, कुन्मारपल्ली या परिसरातील प्रत्येक गावा गावात बस स्थानक, पानटपरी, पत्राच्या शेड, हॉटेल्स खानावळमध्ये हातभट्टीची दारू, देशी, विदेशी दारू, पत्त्याचे डाव, मटका, गुटखा, विविध अवैध धंदे मरखेल पोलीस ठाण्याचे पोलीस सहा. निरिक्षक रवी माधव हुंडेकर यांनी रूजू झाल्या पासून बिट जमादार व पोलीस हवालदार यांना बळीचा बकरा करून चार आकड्यांच्या रक्कमेतून हुंडेकर यांच्या परवानगीने अवैध धंदे चालत आहेत. या अवैध धंद्यामुळे सर्वसामान्य माणसाला जगणे मुश्कील होऊन बसले आहे. आरोपीला साथ फिर्यादीला लाथ अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. या सर्व प्रकरणाला हुंडेकर जबाबदार आहेत.
मानूर गावातील एका हॉटेलमध्ये जुगार अड्डा चालू होता पण दुसरा जुगार अड्डा तेलंगणा राज्याच्या सोपूर रस्त्यावर अनेक महिण्यापासून पोलीसांच्या आशिर्वादाने व हिरवी कंदील दाखवल्याने चार आकड्यांच्या रक्कमेमुळे चालू आहे. हाणेगाव परिसरात विविध प्रकारच्या अवैध धंद्यात मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. या अवैध धंद्यांतून मरखेल पोलीस स्टेशनला हप्त्यातून महिन्याकाठी वर कमाई म्हणून लाखो रुपयांची उलाढाल होत आहे.
नांदेड एलसीबी शाखेचे पोलीस निरीक्षक कोरे व पथकाने मानूर गावातील एका हॉटेलमध्ये जुगार अड्ड्यावर छापा टाकून मोठी कामगीरी बजावली आहे. या मोठ्या कामगिरी बजावल्या बद्दल मरखेल पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नागरीकांतून कौतुक केली जात आहे. मरखेल पोलीस ठाणे हे अवैध धंद्याचे माहेर घर बनले आहे. महीन्याकाठी स्थानिक गुन्हे शाखेच्या वतीने या परिसरात चालणाऱ्या अवैध धंद्यांवर धाड टाकून अवैध धंदे बंद करण्यात यावी अशी मागणी जनतेतून होत आहे.
------------------------------------------
🪀 सर्व महत्त्वाच्या बातम्या मिळवा WhatsApp वर लोकनेता न्यूज ला जॉईन व्हा व शेअर करायला विसरू नका👉 https://lokneta.in/
Post a Comment