लोकनेता न्युज नेटवर्क
भगवानगड (प्रतिनिधी) :- पुणे येथील रयत प्रबोधिनी ही स्पर्धा परीक्षेतील विद्यार्थ्यांना त्यांच्या स्वप्नपूर्तीसाठी मार्गदर्शक ठरणारी एक अग्रगण्य संस्था आहे. ह्या संस्थेच्या वतीने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या प्रामुख्याने गट 'ब' व गट 'क' परीक्षा तसेच अनेक परीक्षांसाठी नियोजनबद्ध पद्धतीने विद्यार्थ्यांची तयारी करून घेतली जाते. या संस्थेने ऑगस्ट २०२३ मध्ये शासकीय अधिकारीपदी निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या सत्कार सोहळ्याप्रसंगी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी श्री क्षेत्र भगवानगडाचे मठाधिपती, श्रीगुरु न्यायाचार्य डॉ.श्री.नामदेव महाराज शास्त्री बाबांना निमंत्रित केले होते. या कार्यक्रमात बोलताना श्रीगुरु शास्त्री बाबांनी श्री क्षेत्र भगवानगडावर आपण (एम.पी.एस.सी./यु.पी.एस.सी.) स्पर्धा परीक्षा केंद्र सुरु करणार असल्याचे जाहीर केले होते. त्यानुसार भगवानगडावरील स्पर्धा परीक्षा केंद्रातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याची जबाबदारी शास्त्री बाबांनी रयत प्रबोधिनीवरच सोपवली होती. गडावर सुरु असलेल्या स्पर्धा परीक्षा केंद्रातील विद्यार्थ्यांनी अपार मेहनतीच्या जोरावर अनेकांनी अधिकारीपदाला गवसणी घातली आहे. अशोक ढाकणे यांची नुकतीच विद्युत सहाय्यक पदी निवड झाली असून यापूर्वी यापैकी नानाभाऊ बाबुराव मुंडे (अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती बँक लिपिक)
गणेश ज्ञानदेव खेडकर (अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती बँक लिपिक), पवन वायाळ (अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती बँक लिपिक),अरुण पंढरी गर्कळ, वाशिम (आरोग्यसेवक,गोंदिया )
जय बाळू जपकर (कार्यकारी सहाय्यक बृहन्मुंबई महानगरपालिका) सूरज अहिरे (तलाठी व ग्रामसेवक), किरण भास्कर सानप (आरोग्य सेवक व महसूल सहाय्यक), सुभाष रंगनाथ मोहिते (प्राध्यापक, S.B.E.S. कॉलेज, छत्रपती संभाजीनगर), विजय संजय दहिफळे (दारूबंदी पोलीस), दीपक रामराव बटूळे (महसूल सहाय्यक), प्रफुल्ल गोदरु डोरले (कर निरीक्षक) इत्यादी विद्यार्थ्यांची वेगवेगळ्या खात्यात अधिकारीपदी निवड झालेली आहे. या निवडीबद्दल श्री क्षेत्र भगवानगडाचे मठाधिपती, श्रीगुरु न्यायाचार्य डॉ.श्री.नामदेव महाराज शास्त्री बाबांनी सर्वांचे अभिनंदन केले आहे. आपल्या गडावर कीर्तनकारांसोबतच अधिकारी देखील घडवले जात असल्याने गडाच्या भक्तवर्गात देखील उत्साह व आनंदाचे वातावरण आहे.
------------------------------------------
🪀 सर्व महत्त्वाच्या बातम्या मिळवा WhatsApp वर लोकनेता न्यूज ला जॉईन व्हा व शेअर करायला विसरू नका👉 https://lokneta.in/

Post a Comment