वाघोलीतील प्राथमिक आरोग्य केंद्रात स्वच्छतेचा बोजवारा रुग्णांत मात्र नाराजीचा नारा !


लोकनेता न्यूज नेटवर्क
  

वाघोली (संतोष कदम) :- वाघोली येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला अस्वच्छतेचा आधार झाला आहे की काय अशीच शंका नागरिकांना उपस्थित होऊ लागली आहे. रुग्णालयातील अधिकारी व महानगरपालिकेचे याकडे दुर्लक्ष झाले असून रोजच्या रोज स्वच्छता व साफसफाई केली जावी अशी मागणी रुग्णांतून होत आहे. स्वच्छतागृहाची देखील अक्षरशः वाताहात झाली आहे. रुग्णालयाच्या आवारात अनेक ठिकाणी कचरा पडून असल्याचे दिसत आहे तसेच भिंती पानाच्या रंगाने लाल झाल्याचे दिसत आहे. या प्राथमिक आरोग्य केंद्रात आसपासच्या परिसरातील असंख्य गरीब रुग्ण उपचार घेण्यासाठी येत असतात. रुग्णालय परिसरात सर्वत्र अस्वच्छता व दुर्गंधीयुक्त वातावरण झाले आहे. झाडांची गळालेली पाने, धुळ, अस्वच्छ स्वच्छतागृह , काही ठिकाणी भिंती पानाच्या रंगाने लाल झालेल्या दिसत आहेत. येथील वरिष्ठ अधिकाऱ्यांचा सफाई कर्मचाऱ्यावर वचक आहे का नाही हाच प्रश्न रुग्णातून उपस्थित होत आहे. 

चौकट  

गरीब परिस्थिती असल्याकारणाने आम्ही रुग्ण प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार घेण्यासाठी येतो पण इथे अस्वच्छ वातावरण पाहायला मिळत आहे. असंख्य गरीब रुग्ण इथे उपचारासाठी येत असतात त्यांना चांगल्या पद्धतीचे वातावरण व उपचार मिळावेत हीच माफक अपेक्षा. 

एक गरीब रुग्ण.

वाघोली परिसर.

------------------------------------------

🪀 सर्व महत्त्वाच्या बातम्या मिळवा WhatsApp वर लोकनेता न्यूज ला जॉईन व्हा व शेअर करायला विसरू नका👉 https://lokneta.in/

0/Post a Comment/Comments