धानोरा बु.येथे संत गुरुवर्य आवधुत पुरी महाराज यांची ६६ वी पुण्यतिथी व जागृत संजिवन सोहळा उत्साहात संपन्न!!


लोकनेता न्युज नेटवर्क

उमरी (महेश पडोळे) :- उमरी तालुक्यातील धानोरा बु.येथे संत गुरुवर्य आवधुत पुरी महाराज यांची ६६ वी पुण्यतिथी व जागृत संजिवन सोहळ्या निमित्त महाराष्ट्र,तेलंगणा कर्नाटक आंध्र प्रदेश सह विविध राज्यांतील लाखो भक्तगण मोठ्या प्रमाणात श्री संत अवधूत पुरी महाराज यांचे शिष्य गण दरवर्षी उपस्थित राहुन पालखी सोहळ्याचा लाभ घेत असतात.

"ध्यान मुलम गुरु मुर्ती पुजा मुलम गुरुपद्म मंत्र । मुलम गुरु वाक्य मोक्ष मुलम गुरु कृपेने हा सोहळा दिनांक २६-११-२०२५ रोज बुधवार सकाळी०६:०० वाजता॥अखंड दत्तनाम पारा ||व सायंकाळी ०४:३० वाजता संत अवधुत पुरी महाराजांच्या समाधीचे अभिषेक करण्यात आला,व लगेच महाप्रसादाला सुरुवात झाली मग रात्री ९:०० वाजता गुरुकृपा भजनी मंडळी, कारला ता.उमरी द.भ.प.चिंताके गुरुजी कारलेकर दुसरे गुरुमुर्ती भजनी मंडळी,धनंज ता. नायगाव (खै.) जि. नांदेड द.भ.प.मारोती पा. हंबर्डे दोन्ही भजनी मंडळाचा दणदणीत कार्यक्रमाला सुरुवात झाली असून हा कार्यक्रम पहाटे साडेपाच वाजेपर्यंत हा सामना रंगतदार झाला आहे,या परिसरातील सर्व भजनीं प्रेमींनी, सद्भक्तांनी या दोन भजनी मंडळीच्या भजनाचा लाभ घेतला आहे.दि.२६/११रोज बुधवार रात्री १२:०० वाजता ३२श्रीफळाची महापुजा संपन्न झाली दिनांक : २७-११-२०२५ रोज गुरुवार रोजी पहाटे ०६:०० वाजता.संत अवधुत पुरी महाराज यांच्या पालखी मिरवणूक सोहळा रावधानोरा नगरीतुन मुख्य रस्त्याने निघाली होती,तर या पालखी सोहळ्यात लाखो माता भगिनी भाविक भक्त गण सहभागी झाले होते.विनित

द.भ.प. गुरुवर्य आनंदपुरी गुरुनागेंद्र आवधुतपुरी महाराज

दत्त मंदिर, मठ संस्थान धानोरा (बु) केले,यावेळी, सुधाकरराव देशमुख धानोरकर सरपंच ईरबा टोपे उपसरपंच कैलास देशमुख दिंगाबर जगताप, पत्रकार उद्धव मामडे,अनिल मेडेवाड गंगाधर बळवंते यांच्यासह बहुसंख्य गावातील जेष्ठ नागरिक उपस्थित होते.

संयोजक :गोविंदगिरी,दिगांबर जगताप,बाळुगिरी मुदखेड, दिगंबर शिंदे, नारायण सिदेवाड, जगदिश गिरी,अथर्व पुरी,गंगाधर गिरी महाराज,दिगांबर महाराज जवळा,विठु महाराज भारती नागठाणा, वामन महाराज हाडोळी, पिंटू गिरी सरसम

आयोजक : शिष्य मंडळी व समस्त गावकरी मंडळी,धानोरा (बु.) आभार प्रदर्शन द.भ.प. गुरुवर्य आनंदपुरी गुरुनागेंद्र आवधुतपुरी महाराज श्री.दत्त मंदिर, मठ संस्थान धानोरा (बु.)यांनी केले आहेत.

------------------------------------------

🪀 सर्व महत्त्वाच्या बातम्या मिळवा WhatsApp वर लोकनेता न्यूज ला जॉईन व्हा व शेअर करायला विसरू नका👉 https://lokneta.in/

0/Post a Comment/Comments