लोकनेता न्युज नेटवर्क
नांदेड (गोविंद मोरे) :- सकल दिव्यांग संघटना तथा बेरोजगार दिव्यांग कल्याणकृती संघर्ष समितीच्या वतीने आपल्या विविध मागण्यांसंदर्भात बुधवार दिनांक 3 डिसेंबर 2025 रोजी जागतिक दिव्यांग दिनीच दिव्यांगांचा महाएल्गार मोर्चा काढण्यात येणार आहे. शासन प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्या दिव्यांगांप्रतीच्या उदासीन धोरणाविरोधात हा आक्रोश मोर्चा असुन स्थानिक स्वराज्य संस्था, नागरी स्वराज्य संस्थांसह शासनाच्या विविध कार्यालयाकडून दिव्यांगांच्या कल्याण व पुनर्वसनासाठी निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयांची अंमलबजावणी करण्यात येत नसल्यामुळे तसेच जिल्ह्यात दिव्यांग व्यक्ती साठींचे हक्क अधिनियम आरपीडब्ल्यु डी ॲक्ट 2016 आणि महाराष्ट्र राज्य दिव्यांग धोरण 2018 ची अद्याप अंमलबजावणी करण्यात आली नसल्यामुळे आणि दिव्यांग शाळा संहिता 2018 नुसार नांदेड जिल्ह्यातील दिव्यांग शाळा चालत नसल्यामुळे यासह आमदार खासदार यांच्या घरावर, कार्यालयावर अर्धनग्न अवस्थेत आक्रोश मोर्चा काढुन भिक मागो आंदोलन करूनही आमदार खासदार यांनी त्यांच्याकडील दिव्यांगांचा दरवर्षीचा राखीव निधी अद्याप खर्च करण्यात आला नसल्याच्या निषेधार्थ हा महाएल्गार आक्रोश मोर्चा काढण्यात येत असल्याचे सकल दिव्यांग संघटना तथा बेरोजगार दिव्यांग कल्याणकृती संघर्ष समितीचे अध्यक्ष राहुल साळवे यांनी आज म्हटले आहे. हा मोर्चा बुधवार दिनांक 3 डिसेंबर रोजी जागतिक दिव्यांग दिनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून सकाळी ठिक 10 वाजल्यापासून काढण्यात येणार असून जिल्हा परिषद, समाज कल्याण विभाग, दिव्यांग सक्षमीकरण विभाग, महानगरपालिका, नियोजन विभाग, नगरपालिका प्रशासन विभाग,जिल्हाधिकारी कार्यालय यासह संबंधित सर्वच शासकीय अधिकारी,आमदार.खासदार.दिव्यांग शाळेचे संस्था चालक यांच्या कार्यालयात, दालनात करण्यात येणार आहे त्यामुळे नांदेड जिल्ह्यातील हजारो दिव्यांगांनी या महाएल्गार मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन राहुल साळवे यांनी केले आहे.
------------------------------------------
🪀 सर्व महत्त्वाच्या बातम्या मिळवा WhatsApp वर लोकनेता न्यूज ला जॉईन व्हा व शेअर करायला विसरू नका👉 https://lokneta.in/
Post a Comment