लोकनेता न्युज नेटवर्क
कंधार (अविनाश कदम) :- कंधार तालुक्यातील कळका येथील काही शेतकऱ्यांना नुकसान भरपाई व पिक विमा मिळालाच नाही पहिला टप्पा तर सोडा दुसऱ्या टप्प्यात सुद्धा एक रुपया मिळाला नाही याचं कारण काय तहसीलदार रामेश्वर गोरे यांच्याकडे विचारणा केली आहे.तलाठी मॅडम यांना विचारले असता त्या म्हणतात तुमचे नाव चुकले तुमचा आधार क्रमांक चुकला आहे तुमची स्पेलिंग चुकली आहे तुम्ही शेतकरी ओळखपत्र बनवले नाही त्यामुळे पैसे खात्यात पडत नाहीत परंतु ते सर्व बरोबर करून सुद्धा उदाहरणार्थ नारायण बाजीराव गायकवाड,गिरमाजी दामोदर गायकवाड यांच्या सह ४० शेतकऱ्यांना एक रुपया सुद्धा येत नाही यांमुळे शेतकरी संभ्रमात असून उपोषण करण्याच्या तयारीत आहेत. तहसीलदार यांनी लक्ष घालावे आणि कळका गावातील नुकसान भरपाई अनुदान न भेटलेल्या ४० शेतकऱ्यांना मदत करावी जाणून-बुजून या शेतकऱ्यांची नावे सोडून दिलेली आहेत असे ४० शेतकरी म्हणतं असून गावातील राजकारण तरी या पाठीमागे नाही ना अशी शेतकऱ्यांची भावना निर्माण झाली आहे तेव्हा तहसीलदार यांनी लक्ष घालून कळका येथील ४० शेतकऱ्यांना न्याय द्यावा अन्यथा उपोषणाशिवाय पर्याय नाही आम्ही उपोषण करावे की काय करावे काही कळेनासे झाले आहे.गावातील लोकांना पैसे येतात आणि आम्ही तसेच उपाशी राहतो आम्ही काय करावे तुम्हीच आम्हाला सांगावे..कळका गावातील बहुतेक जणांना पैसे मिळाले असून ४० शेतकऱ्यांची नावे सोडून दिलेली आहेत नावे सोडून दिली जातात याचे कारण काय नावात चूक नाही आधार कार्डची चूक नाही पीक पाहणी केलेली आहे शेतकरी ओळखपत्र क्रमांक घेतलेला आहे तरी पण या शेतकऱ्यांची नावे दुष्काळी अनुदान वाटपापासून व पिकविम्यापासून वंचित ठेवले जातात.अगोदरच्या टप्प्यात तर एक रुपया मिळालाच नाही आणि दुसऱ्या टप्प्यात सुद्धा वंचित राहण्याची पाळी कळका येथील शेतकऱ्यावर आलेली आहे. तेव्हा तहसीलदार यांनी कळका येथील शेतकऱ्यांना न्याय द्यावा व दुष्काळ अनुदान वाटप व पीक विमा त्यांच्या खात्यावर जमा करण्यात यावा अशी मागणी शेतकऱ्यांनी तहसीलदार यांच्याकडे केली आहे.
------------------------------------------
🪀 सर्व महत्त्वाच्या बातम्या मिळवा WhatsApp वर लोकनेता न्यूज ला जॉईन व्हा व शेअर करायला विसरू नका👉 https://lokneta.in/

Post a Comment