वाघोली भाजी मंडई डेंग्यूचे उगमस्थान..!



लोकनेता न्युज नेटवर्क

वाघोली (संतोष कदम) :- वाघोली बाजार तळ परिसरात अपुऱ्या भौतिक सुविधेमुळे दिवसेंदिवस घाणीचे साम्राज्य वाढले आहे.दुर्गंधीयुक्त घाण पाण्याचे तळे साचले आहे.

 भाजी विक्रेते असतील किंवा बाजार करण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.

       भौतिक सुविधेचा नुसताच बोजवारा उडाल्याचे चित्र दिसतं आहे. अपुऱ्या कचरा कुंड्या, रोजच्या रोज न होणारी स्वच्छता, घाण पाण्याची विल्हेवाट न लावल्याने त्या दुर्गंधीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. भाजी विक्रेत्यांकडून खरा कर वसूल केला जातो मात्र तशा भौतिक सुविधाही पुरविल्या जाव्यात अन् रोजच्या रोज स्वच्छता केली जावी हि भाजी विक्रेत्यांकडून मागणी केल्या जात आहे.

       बाजार तळ मैदानात दर मंगळवारी आठवडे बाजार भरत असतो. मैदानात घाण पाणी साचुन त्याची दुर्गंधी पसरली आहे व भाजी विक्रेत्यांना बसायला जागा अपुरी पडत असल्याने रस्त्याच्या कडेला बसत आहे त्याचा परिणाम वाहतुक कोंडीवर होत आहे.

------------------------------------------

🪀 सर्व महत्त्वाच्या बातम्या मिळवा WhatsApp वर लोकनेता न्यूज ला जॉईन व्हा व शेअर करायला विसरू नका👉 https://lokneta.in/

0/Post a Comment/Comments