शीर्षक: वाघेडा-अडेगाव येथील बस सेवेअभावी नागरिक आणि विद्यार्थी बस पासून वंचित


लोकनेता न्यूज नेटवर्क

चिमूर (शुभम रणदिवे) :- वाघेडा - अडेगाव येथील परिसरातील प्रवाशांना सार्वजनिक बससेवा नसल्यामुळे मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. बस सेवेच्या अभावामुळे विद्यार्थी, नोकरदार आणि दैनंदिन व्यवहार करणारे नागरिक त्रस्त आहेत. अनेक किलोमीटर पायपीट किंवा महागडे खासगी वाहन वापरण्याशिवाय त्यांच्याकडे पर्याय नाही.

मागील अनेक वर्षांपासून ही समस्या कायम आहे. बस नसल्यामुळे प्रवाशांना रोजच्या प्रवासात अधिक वेळ आणि पैसा खर्च करावा लागतो. गर्दी आणि सुरक्षिततेच्या समस्याही वाढल्या आहेत. चांगला रोड नसल्यामुळे अनेक वर्षे बस बंद करण्यात आली होती, आता चिमूर - बामणी - अडेगाव आणि वाघेडा या रोड चे डांबरीकरण पूर्ण करून एक ते दीड वर्षे झाले , अजूनही बस चालू झालेली नाही. या मार्गावरील लवकर तातडीने बस चालू करावी अशी मागणी नागरिक आणि विद्यार्थी संबंधित अधिकाऱ्यांना करत आहेत ! 

नवीन बससेवा सुरू केल्यास प्रवाशांना मोठा दिलासा मिळेल. तसेच, वाहतूक कोंडी कमी होण्यास आणि प्रदूषण नियंत्रणासही मदत होईल. त्यामुळे, संबंधित विभागाने यावर तातडीने लक्ष घालून उपाययोजना करावी, अशी अपेक्षा आहे.

------------------------------------------

🪀 सर्व महत्त्वाच्या बातम्या मिळवा WhatsApp वर लोकनेता न्यूज ला जॉईन व्हा व शेअर करायला विसरू नका👉 https://lokneta.in/

0/Post a Comment/Comments