लोकनेता न्यूज नेटवर्क
किनवट (मारोती देवकते) :- तालुक्यात आज एक नाव सर्वत्र चर्चेत आहे — करण ऐड्रलवार. वयाने तरुण पण विचाराने परिपक्व, कार्याने सक्षम आणि समाजसेवेने ओळख निर्माण केलेला हा तरुण आज हजारो युवकांच्या हृदयात स्थान मिळवून बसला आहे.
वारसाने संपत्ती मिळते, पण नेतृत्व स्वतःच्या कर्तृत्वाने निर्माण करावं लागतं — या म्हणीचा प्रत्यय करण ऐड्रलवार या नावाने येतो.
विद्यार्थी नेतृत्वातून समाजकारणापर्यंतचा प्रवास
करण ऐड्रलवार यांचे नेतृत्व कौशल्य कॉलेज जीवनातच दिसून आले. बी.पी. कॉलेज, किनवट येथे विद्यार्थी निवडणुकीत प्राध्यापकांच्या हस्तक्षेपाविरोधात ठाम भूमिका घेत त्यांनी विद्यार्थ्यांच्या स्वायत्ततेसाठी लढा दिला. परिणामी, ते विद्यार्थी सचिव म्हणून निवडून आले.
त्यांनी केवळ स्वतःचा विजयच मिळवला नाही, तर इतर महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनाही नेतृत्वाची प्रेरणा दिली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली दोन विद्यार्थी पुढे विद्यापीठ स्तरावर चमकले — हेच त्यांच्या नेतृत्वाचे द्योतक आहे.
जनतेच्या मनातला करण
जसा महाभारतातील कर्ण गरीबांच्या आशीर्वादाने श्रीमंत होता, तसाच आजचा करण” जनतेच्या प्रेमातून बळ मिळवतो.
वाडी-तांड्यातील, आदिवासी व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या समस्या — शिष्यवृत्ती, हॉस्टेल, फीवाढ किंवा परीक्षेतील अडचणी — या सगळ्या तो स्वतःच्या पुढाकाराने सोडवतो.
इंग्रजी शाळांमधील अवाजवी फीविरोधात त्यांनी शेकडो विद्यार्थी व पालकांसह मोर्चा काढून शिक्षण विभागाकडे निवेदन दिले. परिणामी, अनेक पालकांना दिलासा मिळाला.
मुंबईत असला तरी मन किनवटमध्ये
मुंबईत कार्यरत असूनही करण ऐड्रलवार यांचे मन कायम किनवटच्या जनतेत रमत असते.
कार्यकर्त्यांच्या सुखदुःखात तो सहभागी होतो, गरीबांना वैद्यकीय मदत पुरवतो आणि सामाजिक तसेच धार्मिक कार्यक्रमांत सक्रिय सहभाग घेतो.
त्याच्या दानशूर वृत्तीमुळे आज किनवट तालुक्यात त्याच्याशी निष्ठा ठेवणाऱ्या कार्यकर्त्यांची मोठी फौज उभी आहे.
निष्ठेचा आदर्श — राजकारणात स्थैर्य
करण ऐड्रलवार यांनी समाजसेवेच्या माध्यमातून राजकारणात पाऊल ठेवले आणि नेहमीच युती धर्माचे पालन केले.
स्वर्गीय प्रदीप नाईक यांच्या प्रचारासाठी त्यांनी जीव तोड मेहनत घेतली. त्यांच्या अथक प्रयत्नांमुळे नाईक यांना किनवट शहरात विक्रमी आघाडी मिळाली.
नाईक साहेबांच्या अकाली निधनानंतर अनेक कार्यकर्ते दिशाभूल झाले, परंतु करण मात्र निष्ठेच्या भूमिकेत ठाम राहिले. दुःखाच्या क्षणीही त्यांनी नाईक कुटुंबासोबत खंबीरपणे उभे राहून आपली सच्चाई सिद्ध केली.
पुरग्रस्तांसाठी आधारवड
किनवट तालुक्यात अतिवृष्टीमुळे शेकडो कुटुंबांचे संसार उद्ध्वस्त झाले तेव्हा, करण ऐड्रलवार यांनी स्वतः पुढाकार घेत हजाराहून अधिक कुटुंबांना राशन किट पोहोचवली.
तो फक्त भाषण करणारा नेता नाही, तर संकटात प्रत्यक्ष लोकांपर्यंत पोहोचणारा कार्यकर्ता आहे.
त्याच्या या कृतीने अनेकांच्या डोळ्यात अश्रू आणले — ही होती माणुसकीची खरी व्याख्या.
किनवटचा उदयोन्मुख चेहरा
किनवटमध्ये नेते बरेच असतील, पण लोकांपर्यंत पोहोचून त्यांच्या समस्यांना स्वतःच्या समस्या मानणारा नेता मात्र करण ऐड्रलवार आहे.
तो कार्यकर्त्यांना फक्त चटई उचलणारे” मानत नाही, तर त्यांना आत्मसन्मान, रोजगार आणि भविष्य देण्याचे स्वप्न पाहतो.
जात, धर्म, पंथ यांच्या पलिकडे जाऊन ‘माणूसकीचे राजकारण’ करणारा तो एक नवा चेहरा आहे — किनवटचा भविष्यदर्शी चेहरा. करण ऐड्रलवार हे केवळ एक नाव नाही — ती एक विचारधारा आहे.
त्यांचा प्रवास म्हणजे नव्या युगातील किनवटच्या राजकारणाचा नवा अध्याय.
त्यांच्याकडे आहे प्रेरणा, तळमळ आणि कृतीशीलता — जी उद्याच्या किनवटच्या नेतृत्वाला नवी दिशा देईल.
------------------------------------------
🪀 सर्व महत्त्वाच्या बातम्या मिळवा WhatsApp वर लोकनेता न्यूज ला जॉईन व्हा व शेअर करायला विसरू नका👉 https://lokneta.in/

Post a Comment