लोकनेता न्यूज नेटवर्क
पालघर (सतेंद्र मातेरा) :- स्वातंत्र्य संग्रामातील आद्यक्रांतिकारक राघोजी भांगरे यांच्या जयंतीनिमित्त पालघर मधील सफाळे येथील मालकरीपाडा येथे मोठ्या उत्साहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात परिसरातील नागरिक, तरुण व सामाजिक कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त सहभाग होता.
कार्यक्रमाचे उद्दिष्ट राघोजी भांगरे यांच्या क्रांतिकारी कार्याचे स्मरण करून समाजात देशभक्ती व जागृतीचा संदेश पोहोचवणे असे ठेवण्यात आले होते. कार्यक्रमादरम्यान उपस्थित मान्यवरांनी राघोजी भांगरे यांच्या शौर्य, त्याग आणि स्वातंत्र्यलढ्यातील योगदानाची माहिती देत त्यांच्या कार्याची प्रेरणा आजच्या तरुण पिढीपर्यंत पोहोचविण्याचे आवाहन केले.
या प्रसंगी रुपेश धांगडा, सुरेश भोईर, काशिनाथ वरठा, नितीन बोंबाडे, अविनाश भोईर, प्रशिल वरठा, रोहिदास कामडी, सुनिल घोष, सुनिल कोम, बबन धांगडा, प्रसाद डगले, आबाजी डगले, अजय सातलिया, प्रमोद सांबरे, विशवनाथ मालकरी आणि नथू पिलेना यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली. शेवटी “जय मल्हार” आणि “राघोजी भांगरे अमर रहे” अशा देशभक्तीपर घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. या प्रसंगी परिसरात देशप्रेम आणि आदरभावनेचे वातावरण निर्माण झाले होते.
------------------------------------------
🪀 सर्व महत्त्वाच्या बातम्या मिळवा WhatsApp वर लोकनेता न्यूज ला जॉईन व्हा व शेअर करायला विसरू नका👉 https://lokneta.in/

Post a Comment