अखंड दत्तनाम सप्ताह सोहळा मौजे पेठवडज ता.कंधार जि.नांदेड


लोकनेता न्युज नेटवर्क

पेठवडज (प्रदीप मुगावे) :- सर्व भाविक भक्तांना कळविण्यात आनंद होतो की, दर वर्षी प्रमाणे याही वर्षी (दक्षिण माहूर) पेठवडज ता. कंधार जि. नांदेड श्री. गुरुमुर्ती तपोवनिधी संत आनंदबन गुरु केवळबन महाराज दत्त संस्थान निळेगव्हाण शाखा पेठवडज च श्री संत प.पू. आनंदबन गुरु उदत्तबन महाराज श्री.दत्त संस्थान निळेगव्हाण यांच्या कृपा आशीर्वादाने व तसेच श्री संत बालयोगी देवपुरी महाराज मठ संस्थान कहाळा (खु) यांच्या शुभ आशीर्वादाने पेठवडज येथे 47 वा श्री. दत्त जयंती सोहळा व सप्ताहास प्रारंभ होत आहे.

सप्ताहाची सुरुवात

मिती मार्गशीर्ष शु.8 दि. 28/11/2025 रोज शुक्रवार पासुन सप्ताहाची सुरुवात ते मिती मार्गशीर्ष शु.14 दि.04/12/2025 रोज गुरुवार दु. ठिक. 12:00 वाजता. दत्तजन्म सोहळा पार पडेल व पालखी मिरवणूक निघेल‌ व महाप्रसादा कार्यक्रम होईल. 

सप्ताहातील दैनिक कार्यक्रम

पहाटे 3 ते 6 आनंदाचा पारा-भूपाळी व काकडा आरती, सकाळी 10 ते 1 महापुजा व भजन, सायंकाळी 5 ते 7 नवनाथ ग्रंथाचे पारायण व रात्री 9 ते 11 किर्तन व महापुजा.

दैनंदिन किर्तन

1) शुक्रवार दि.28/11/1025 रोजी द.भ.प.रमेश महाराज माऊलीकर

2) शनिवार दि.29/11/2025 रोजी द.भ.प.श्री.संत संतोष पुरी महाराज रा. चोळाखा

3) रविवार दि.30/11/2025 रोजी द.भ.प.भी महंत ज्ञानेश्वर भारती महाराज रा.माहूरगड

4) सोमवार दि.01/12/2025 रोजी द.भ.प.श्री.संत आनंदबन महाराज महाराज मठ संस्थान तुप्पा‌, नांदेड

5) मंगळवार दि.02/12/2025 रोजी द.भ.प.श्री. संत अविनाशबन महाराज कोलंबीकर

6) बुधवार दि.03/12/2025 रोजी द.भ.प.श्री संत सचिदानंद बन गुरु यदुबन महाराज मठ संस्थान सरेगाव

यांचे किर्तन आयोजित करण्यात आले आहे. 

बुधवार दि.03/12/2025 रोजी ओम मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल नांदेड डॉ.संदीप चाबुकस्वार पाटील व डॉ.सुनिता संदीप चाबुकस्वार (गायकवाड) यांच्या सौजन्य भव्य आरोग्य शिबीर ठेवण्यात आले आहे. 

गुरुवार, दि.04/12/2025 रोजी ठिक दु.12: 00 वाजता दत्तजन्म सोहळा पार पडेल.

सायंकाळी ठिक 8 वाजता श्री. संत बाळगिर महाराज भजनी मंडळ मौजे, किवळा ता. लोहा जि.नांदेड व श्री. संतकृपा भजनी मंडळ मौजे, भंढारकुर्मट्याची वाडी ता. कंधार जि.नांदेड या दोन भजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. 

शुक्रवार, दि.05/12/2025 रोजी दु.ठिक 2 वाजता भव्य कुस्तीची दंगल सुरू होईल.

व सायंकाळी ठिक 8 वाजता श्री. कृष्णधाम संगीत भजनी मंडळ आव्हई ता. पुर्णा जि.परभणी व जय माँ जिजाऊ संगीत भजनी मंडळ पिंपरणवाडी ता. लोहा जि. नांदेड या दोन संगीत भजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. 

शनिवार, दि.06/12/2025 रोजी भव्य पशु प्रदर्शन व सायंकाळी 8 वाजता. 

महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध भारुडसम्राट, झी. टॉकिज फेम, श्री. कृष्णा महाराज जोगदंड यांचा भारुड्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

------------------------------------------

🪀 सर्व महत्त्वाच्या बातम्या मिळवा WhatsApp वर लोकनेता न्यूज ला जॉईन व्हा व शेअर करायला विसरू नका👉 https://lokneta.in/

0/Post a Comment/Comments