चापुले बि . डी. यांचा निरोप समारंभ संपन्न


लोकनेता न्युज नेटवर्क

शिराढोण (लक्ष्मण पांडागळे) :- प्राथमिक आरोग्य केंद्र सावरगाव पीर ता. मुखेड येथील आरोग्य सहाय्यक चापुले बि . डी . हे आरोग्य विभागात पंचवीस वर्षे प्रदीर्घ सेवा करून शासकीय सेवेतून आरोग्य सहाय्यक या पदावरून नियत वयोमानानुसार दि 31 ऑक्टोंबर रोजी 2025 रोजी सेवानिवृत्त झाले आहेत . त्यांच्या सेवानिवृत्ती सत्कार व निरोप समारंभ सर्व कर्मचारी वृंद प्राथमिक आरोग्य केंद्र सावरगांव पिर. ता. मुखेड. व चापुले परिवार या दोघांच्या संयुक्त विद्यमाने श्रीकृष्ण मंदिर सावरगाव पिर येथे दि 31 ऑक्टोंबर 2025 रोजी सत्कार समारंभाचे आयोजित करण्यात आले होते . 
या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून वैद्यकीय अधिकारी डॉ . मयुरी देशमुख , तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉ . बसवेश्वर पाटील , डॉ . सुमित जाधव , श्रीकृष्ण मंदिर समितीचे अध्यक्ष विठ्ठलराव उमाटे व आदींची व्यासपीठावर उपस्थिती होती . अध्यक्षीय समारोपात डॉ . मयुरी देशमुख यांनी श्री बालासाहेब चापुले यांनी केलेल्या आरोग्य सेवेबद्दल भरभरून शुभेच्छा व्यक्त करत तुम्ही केलेल्या आरोग्य समाजसेवेच्या आशीर्वादातून पुढील आयुष्य सुखात समाधानात जावो म्हणून भरभरून शुभेच्छा व्यक्त केल्या . त्याचबरोबर पठाण वाय . ए . आरोग्य सहाय्यक यांनी देखील आपल्या मनोगतात आपल्या सहकारी मित्राला सेवानिवृत्तीच्या भरभरून शुभेच्छा व्यक्त केल्या . यावेळी सावरगाव पिर प्राथमिक आरोग्य केंद्राचे कनिष्ठ सहायक अश्टुरे बी. एस , श्रीमती भोसले एन . जी , पाटील ए . ए , पठाण वाय . ए , बद्देवाड आर. एस , कु . वाघमारे ए . डी , मोरे डी . एस , शिवकांत डांगे , श्रीमती बनसोडे पी .डी , यांच्यासह सिस्टर , आशा वर्कर सुपरवायझर , व चापुले यांचा मित्रपरिवार आदी उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नरसिंग सोनटक्के यांनी करून उपस्थित आमचे आभार मानले .
------------------------------------------

🪀 सर्व महत्त्वाच्या बातम्या मिळवा WhatsApp वर लोकनेता न्यूज ला जॉईन व्हा व शेअर करायला विसरू नका👉 https://lokneta.in/

0/Post a Comment/Comments