लोकनेता न्युज नेटवर्क
कलंबर (प्रतिनिधी) :- मराठवाड्यातील सर्व संत महंत वारकरी व भाविक भक्तांना कळविण्यात येते की, योगीराज श्री संत निवृत्ती महाराज ब्रम्हीभूत श्री संत मोतीराम महाराज यांचे एकत्रित असणारे मंदिर म्हणजे केवळ नांदेड जिल्ह्यातील श्री क्षेत्र कलंबर खुर्द ता. लोहा येथे जगदगुरु तुकाराम महाराज यांचे वंशज ह.भ.प. श्री बापूसाहेब महाराज देहूकर श्री गुरु गयबी नागेंद्र भारती महाराज पानभोसी यांच्या हस्ते मूर्ती व स्थापना व कलशारोहण सोहळा भावीक भक्तांच्या उपस्थितीत आणि भव्य दिव्य थाटात संपन्न झाला त्यानिमित्ताने वर्धापन दिन यात्रा व किर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
मार्गशिर्ष वद्य त्रयोदशी बुधवार दिनांक १७ डिसेंबर २०२५ (पहिला दिवस)
महापूजा वेळ सकाळी ६ वा. १० ते १२ ग्रंथ वाचन व श्री संत निवृत्ती महाराज व श्री संत मोतीराम महाराज या ग्रंथांचे वाचन होईल सर्व वाचक व सूचक मंडळींनी ग्रंथ वाचनासाठी उपस्थित रहावे.
प्रवचन ह.भ.प.श्री रामेश्वर महाराज बारडकर वेळ दुपारी २ ते ४
मार्गशिर्ष वद्य चतुदर्शी गुरुवार दिनांक १८ डिसेंबर २०२५ (दुसरा दिवस)
पालखी सोहळा- मंदिर ते कलंबर खु. भोपाळेवाडी फाटा मार्गे गुंडेवाडी परत मंदिर वेळ सकाळी ७ ते ११ वा.
विविध क्षेत्रात अतुलनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना सेवा गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. वेळ सकाळी ११ ते ०१ वा.
महाराष्ट्रातील नामवंत व सुप्रसिद्ध किर्तनकार
ह.भ.प. श्री राम महाराज खोरसकर श्री क्षेत्र आळंदी यांचे किर्तन वेळ दुपारी १ ते ३ महाआरती दुपारी ३.३० वा. नंतर महाप्रसाद महाप्रसादाचे यजमान श्री बापूराव गोविंदराव निळकंठे
गायक, वादक व भजनी मंडळ
गुंडेवाडी, भोपाळेवाडी, संगुचीवाडी, पांगरा, खुडेवाडी, मोकलेवाडी, लाठ (खु.), लाठ (बु.), भंडारकोमट्याचीवाडी, आलेगाव, मंगलसांगवी, बामणी, निळा, दापशेड, मडकी, टेळकी, पोखरभोसी, पोखरी, शेलगाव, मलकापूर, रायवाडी, धावरी, बारुळ, नंदनवन, चिखली, हाळदा, चिंचोली, पानभोसी, सोनखेड, वंजारवाडी, नवघरवाडी, शिराढोण, कलंबर
आयोजक विश्वस्त मंडळ व कलंबर पंचक्रोशी ता. लोहा जि. नांदेड
------------------------------------------
🪀 सर्व महत्त्वाच्या बातम्या मिळवा WhatsApp वर लोकनेता न्यूज ला जॉईन व्हा व शेअर करायला विसरू नका👉 https://lokneta.in/

Post a Comment