म.न.पा शाळा वाघोली येथे संविधान दिन उत्साहात साजरा


लोकनेता न्युज नेटवर्क

वाघोली (संतोष कदम) :- संविधान दिन २६ नोव्हेंबर रोजी भारतभर मोठ्या आनंदाने साजरा केला जातो. 

संविधान हे २६ नोव्हेंबर १९४९ रोजी भारताच्या संविधान सभेने स्वीकारले आणि २६ जानेवारी १९५० रोजी लागु झाले.

दि. २६/११/२०२५ म. न. पा. शाळा वाघोली क्र.२ शाळेत संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात आला. शाळेचे मुख्याध्यापक श्री. प्रविण सातव सर, जेष्ठ शिक्षिका सुनिता सातव मॅडम, पोळ मॅडम आणि इतर सहकारी यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि भारताचे संविधान दोन्ही प्रतिमांचे प्रथमत: पूजन करण्यात आले. शाळेच्या गीतमंच्या मधील मुलींनी श्री. महेश गावडे सर यांनी स्वतः रचनाबद्ध केलेले संविधानावर आधारित गीत सादर करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. ई.३ री आणि ४ थीच्या मुलींनी छान भाषणे आणि सुश्राव्य गीतांचे सादरीकरण केले. या कार्यक्रमासाठी शाहीर धम्मदीप सरकटे यांनी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती दर्शवत शाळेसाठी संविधानाची प्रत भेट स्वरूपात देऊन संविधान गीत सादर केले. सर्वात शेवटी शाळेचे मुख्याध्यापक सातव सरांनी मुलांना संविधान दिनाविषयी मोलाचे मार्गदर्शन करून कार्यक्रमाची सांगता झाली.या कार्यक्रमासाठी रुपाली वाळुंज,शीतल चव्हाण,मीनल शिंदे, दिपाली माळी,सुनीता तांबे,अलका विर,पूजा पाटील,सुलभ पोळ, आशा आर्डे,नवनाथ भोसले,किरण लांडगे,संभाजी साळवे, सर्जेराव नरसाळे,आफ्रिन पठाण इत्यादी शिक्षकवृंद यांनी परिश्रम घेतले.

------------------------------------------

🪀 सर्व महत्त्वाच्या बातम्या मिळवा WhatsApp वर लोकनेता न्यूज ला जॉईन व्हा व शेअर करायला विसरू नका👉 https://lokneta.in/

0/Post a Comment/Comments