लोकनेता न्यूज नेटवर्क
देगलूर (जयपाल दावनगीरकर) :- देगलूर तालुक्यातील मरखेल येथे 26 नोव्हेंबर 25 रोजी संविधान दिनानिमित्त संविधान सन्मान सोहळा व 26 / 11 च्या बॉम्बस्फोट हल्ल्यात कर्तव्यावर असणारे पोलीस कर्मचारी, पोलीस अधिकारी बलिदान दिनानिमित्त त्यांना अभिवादन व करडखेड ते माणिक प्रभू येथे दरवर्षी जाणारी पदयात्रा मरखेल येथे आल्याने त्यांचा पालखी प्रमुख यांचे स्वागत करून मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. या संविधान अभिवादन कार्यक्रमाचे अध्यक्ष मनोहर माली पाटील सेवानिवृत्त केंद्रप्रमुख हे होते. कार्यक्रमाची प्रस्तावना योगेश महाराज कुलकर्णी यांनी केले उपस्थितांना पालखी प्रमुख श्रीपाद गुरुदास महाराज यांनी पालखीचे व पदयात्रे चे उद्देश आणि महत्व सविस्तर माहिती दिले पालखीच्या बरोबर माणिक गुरुदास महाराज, संतोष शास्त्री, श्रीधर महाराज डॉक्टर, राजकुमार कुलकर्णी इत्यादी उपस्थित होते. या कार्यक्रमांसाठी गावातील प्रतिष्ठित नागरिक संजय कपाटे, मारोती मरखेले, अशोक गवरे, भरत पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष गंगाधर रावसाहेब, एसआरपी अंबोरे, गोविंदराव मरखेले, माणिकराव जाधव, अमोल रावसाहेब, संजय भास्करे व इतर मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे संचालन सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर मच्छिंद्र गवाले यांनी केले तर संविधानावर मार्गदर्शन करत असताना मच्छिंद्र गवाले यांनी म्हणाले की हे संविधान भारतातल्या नागरिकांनी स्वतः प्रत अर्पण केलेला आहे. संविधानातल्या भाग तीन मधील मूलभूत अधिकारा बरोबर भाग चार मध्ये मूलभूत कर्तव्य, नागरिकांना बजावण्याच्या संदर्भात आव्हान केले. संविधानाने दिलेले अभिवचन तळागाळापर्यंत पोहोचायचे असेल तर संविधानाच्या उद्देशिकेमध्ये जी मूल्य दिली आहेत ती सर्वसामान्य पर्यंत रुजवण्याची गरज आहे. असे सांगितले.
------------------------------------------
🪀 सर्व महत्त्वाच्या बातम्या मिळवा WhatsApp वर लोकनेता न्यूज ला जॉईन व्हा व शेअर करायला विसरू नका👉 https://lokneta.in/

Post a Comment