लोकनेता न्यूज नेटवर्क
पालघर (सतेंद्र मातेरा) :- मुंबई- अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर व्हिवलवेढे-महालक्ष्मी परिसरात दि. ८ नोव्हेंबर रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास झालेल्या अपघातात दुचाकीस्वार दांपत्य गंभीर जखमी झाले. हा अपघात अज्ञात महिंद्रा पिकअप वाहनाने दिलेल्या जोरदार धडकेमुळे झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, जखमींची नावे विष्णू रावते (वय ४६) आणि त्यांची पत्नी गुलाब विष्णू रावते (वय ४४, रा. गांजाड, ता. डहाणू, जि. पालघर) अशी आहेत. हे दांपत्य आपल्या दुचाकी (क्र. MH-48 AP-8892) वरून गुजरातकडून मुंबईच्या दिशेने प्रवास करत असताना मागून आलेल्या अज्ञात महिंद्रा पिकअप वाहनाने जोरदार ठोकर दिली.
या धडकेत विष्णू रावते यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली असून त्यांच्या पत्नीला किरकोळ दुखापत झाल्याची माहिती मिळाली आहे. अपघातानंतर परिसरातील नागरिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत जखमींना ॲम्ब्युलन्सच्या सहाय्याने जिल्हा उप रुग्णालय, कासा येथे उपचारासाठी हलविण्यात आले.
अपघाताची माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक मकानदार व चार पोलीस अंमलदार घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी अपघातग्रस्त वाहन बाजूला करून महामार्गावरील वाहतूक सुरळीत केली. दरम्यान, पिकअप वाहनचालक अपघातानंतर फरार झाला असून, चारोटी पोलिस ठाण्याकडून या घटनेचा पुढील तपास सुरू आहे.
------------------------------------------
🪀 सर्व महत्त्वाच्या बातम्या मिळवा WhatsApp वर लोकनेता न्यूज ला जॉईन व्हा व शेअर करायला विसरू नका👉 https://lokneta.in/

Post a Comment