राजकुंवर महाविद्यालय, वाघरुळ येथे "भारतीय संविधान दिन" उत्साहात साजरा


लोकनेता न्युज नेटवर्क

वाघरुळ (प्रतिनिधी) :- राजकुंवर महाविद्यालयात भारतीय संविधान दिन उत्साहपूर्ण आणि अभिमानाने साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात प्रास्ताविकाने झाली, त्यानंतर उपस्थित सर्व मान्यवर, प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांनी भारतीय संविधानाच्या प्रस्तावनेचे सामूहिक वाचन करून संविधान मूल्यांप्रती निष्ठा व्यक्त केली.

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.राजेंद्र जायभाये यांनी भूषविले. त्यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात भारतीय संविधानाची निर्मिती, त्यामागील विचारवंतांचे योगदान आणि लोकशाही व्यवस्थेतील नागरिकांची जबाबदारी यावर प्रकाश टाकला. प्रा.शरद काकडे सर हे विशेष आमंत्रित वक्त्यांनी संविधानातील मूलभूत अधिकार, कर्तव्ये आणि समानतेच्या तत्त्वाचे महत्त्व पटवून सांगितले.

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा.अनिल शिंदे यांनी केले, तर आभारप्रदर्शन प्रा.विजयकुमार देशमुख यांनी केले. संविधान दिन कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रप्रेम, लोकशाही मूल्यांची जाणीव आणि कायद्याविषयी आदर अधिक दृढ झाल्याचे प्रतिपादन करण्यात आले. यावेळी प्रा.डॉ.सरला डोईफोडे,प्रा.दुर्गा रुपणर,प्रा.रेणुका चित्राल,प्रा.श्रद्धा सातकर,प्रा.चंद्रमुनी जोगदंड,प्रा.समाधान सरोदे,प्रा.अरुण गिते,प्रा.भगवान जोगदंड,प्रा. किशोर वाहूळ, प्रा.सारेक शेख,श्री.सुनील शिंदे,श्री.पवन जोगदंड व इतर उपस्तित होते.

------------------------------------------

🪀 सर्व महत्त्वाच्या बातम्या मिळवा WhatsApp वर लोकनेता न्यूज ला जॉईन व्हा व शेअर करायला विसरू नका👉 https://lokneta.in/

0/Post a Comment/Comments