फुलगाव येथे १३ डिसेंबर रोजी मोफत सामुहिक विवाह सोहळ्याचे आयोजन


लोकनेता न्यूज नेटवर्क

फुलगाव (गौतम पाटोळे) :- श्री. सत्यसाई सेवा संघटना पुणे, महाराष्ट्र पश्चिम यांच्या वतीने भगवान श्री. सत्यसाई बाबांच्या शंभराव्या जन्मदिनानिमित्त फुलगाव ता. हवेली जि. पुणे येथील नेताजी सुभाषचंद्र बोस सैनिकी शाळा येथे शनिवार दि. १३ डिसेंबर २०२५ रोजी १०१ मोफत सामुहिक विवाह सोहळ्याचे आयोजन केले असल्याची माहिती, फुलगाव समिती प्रमुख सुनिल वागस्कर यांनी दिली.

श्री.सत्यसाई संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र राज्याध्यक्ष श्री.धर्मेश वैद्य,जिल्हाप्रमुख, कॅप्टन श्री. गिरीश लेले,सामुहिक विवाह सोहळ्याचे संयोजक श्री.बाळासाहेब वाल्हेकर,व्यंकटेश जालगी,श्री.सुनिल वागस्कर, श्री.शंकर वागस्कर,नितीश श्रीवास्तव यांच्या मार्गदर्शनाखाली सामुहिक विवाह सोहळ्याचे उत्कृष्ट नियोजन सुरू आहे.

श्री.सत्यसाई सेवा संघटनेच्या वतीने सामाजीक बांधीलकीतून भगवान श्री.सत्यसाई बाबांच्या शंभराव्या जन्मदिनानिमित्त सर्व जातीय सामुदायीक विवाह सोहळा आयोजित करण्यात आला असून विवाह सोहळ्यात लग्न लावणाऱ्या नागरीकांचा वेळ,श्रम व आर्थीक बचत होईल.भगवान श्री.सत्यसाई बाबांच्या पवित्र आशीर्वादाने १०१ प्रेमळ जोडप्यांचा विवाह सोहळा साजरा करण्याचा श्री.सत्यसाई सेवा संघटनेचा मानस आहे.

श्री.सत्यसाई संघटनेचे सर्व पदाधिकारी सामुदायीक विवाह सोहळ्यासाठी अथक परिश्रम घेत आहेत.

सामुदायीक विवाह सोहळ्यात सहभागी होणाऱ्या वधुसाठी सोन्याचे मनी मंगळसुत्र,चांदीची जोडवी शालु व चप्पल, वरासाठी सफारी सुट,संसारासाठी लागणारी भांडी,हार, बाशिंग व होमाचे साहित्य मोफत दिले जाईल. सामुदायीक विवाह सोहळ्यासाठी येणाऱ्या सर्व पाहुण्यांची भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे.

सामुदायीक विवाह सोहळ्यासाठी संपर्क फुलगाव समिती प्रमुख श्री.सुनिल वागस्कर भ्रमणध्वनी क्रमांक८८३०७२७१८१. फुलगाव समिती सेवादल प्रमुख श्री.शंकर वागस्कर भ्रमणध्वनी क्रमांक ९८२३८५५८८१ येथे त्वरीत संपर्क साधावा असे आवाहन श्री.सत्यसाई सेवा संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे.

------------------------------------------

🪀 सर्व महत्त्वाच्या बातम्या मिळवा WhatsApp वर लोकनेता न्यूज ला जॉईन व्हा व शेअर करायला विसरू नका👉 https://lokneta.in/

0/Post a Comment/Comments