विकास म्हणजे संवेदनशीलता”- डॉ. विठ्ठलराव कुडमुलवार यांची वृक्षारोपणातून नवी दिशा


लोकनेता न्यूज नेटवर्क

कुंडलवाडी (गंगाधर दुसलवाड) :- विकास म्हणजे फक्त रस्ते, इमारती, आणि वीजपुरवठा नाही…

विकास म्हणजे संवेदनशीलता, माणुसकी आणि पर्यावरणाशी नातं , हे दाखवून दिलं आहे माजी नगराध्यक्षा सौ.अरुणाताई कुडमुलवार व माजी उपनगराध्यक्ष डॉ. विठ्ठलराव कुडमुलवार यांनी.

त्यांनी आपल्या कार्यकाळात ‘हरित कुंडलवाडी’चा संकल्प हाती घेत वृक्षारोपणाचा वसा सुरू केला. शहराच्या प्रत्येक प्रमुख मार्गावर, सार्वजनिक ठिकाणी, शाळांच्या परिसरात, सरकारी दवाखाना आणि विशेष म्हणजे स्मशानभूमीतही त्यांनी वृक्षारोपण करून एक वेगळी ओळख निर्माण केली.

“स्मशानभूमी ही केवळ दु:खाची जागा नसावी, तर ती शांततेचं, आत्मिक समाधानाचं ठिकाण असावं,” या विचारातून त्यांनी त्या परिसरात फुलझाडं, औषधी वनस्पती, फळांची , फुलांची आणि छायादार वृक्ष लावले. त्या ठिकाणी फुलांच्या सुगंधाने, झाडांच्या सावलीने आणि निसर्गाच्या सौंदर्याने नटलेलं आहे.

स्थानिक नागरिक अभिमानाने सांगतात ,

*“पूर्वी स्मशानभूमी म्हणजे अंधार, धूळ आणि ओसाडपणा. पण आज ते ठिकाण शांततेचं प्रतीक झालंय. हे शक्य झालंय डॉ. विठ्ठलराव कुडमुलवार यांच्या संवेदनशील दृष्टिकोनामुळे.”*.. पुढेही त्यांचे कुंडलवाडी च्या विकासासाठी उद्दिष्टे समोर आहेत.

नगरपालिकेच्या माध्यमातून वृक्षसंवर्धनासाठी स्वतंत्र उपक्रम राबवून त्यांनी शहरातील हरित पट्टा वाढवण्याचं काम केलं. पर्यावरणपूरक उपक्रमांतून त्यांनी कुंडलवाडीला एक “हरित आणि हसतं शहर” बनवण्याचं स्वप्न साकार व्हावं असा त्यांच्या ध्येयवाद आहे

डॉ. कुडमुलवार यांचं म्हणणं आहे.“झाडं ही फक्त निसर्गाची शोभा नाहीत, ती आपल्या अस्तित्वाची सावली आहेत. प्रत्येक नागरिकाने एक तरी झाड लावलं, तर कुंडलवाडी आपोआप सुंदर होईल.”

------------------------------------------

🪀 सर्व महत्त्वाच्या बातम्या मिळवा WhatsApp वर लोकनेता न्यूज ला जॉईन व्हा व शेअर करायला विसरू नका👉 https://lokneta.in/

0/Post a Comment/Comments