पेदाआसापूर येथे सुदाम राठोड यांचा स्वागत व सत्कार करण्यात आले


लोकनेता न्यूज नेटवर्क

जिवती (सय्यद शब्बीर जागीरदार) :- जिवती तालुक्यातील शेतकऱ्यांना अतिवृष्टीचे हेक्टरी ८५०० रुपये मिळाले पाहिजे व तालुक्यातील इतरही सहा मागण्या घेऊन सामाजिक कार्यकर्ते सुदाम राठोड ( दि.०४ ) पासून उपोषणाला बसले होते व ( दि.०७ ) चौथ्या दिवशी संध्याकाळी तहसीलदार यांच्याशी चर्चा झाल्यानंतर पूर्ण मागण्या मान्य करू असे लेखी आश्वासन घेतल्यानंतर सुदाम राठोड यांनी उपोषण स्थगित केले. या शेतकऱ्याच्या दात्याचे पेद्दाआसापूर नगरितील नायक व्यंकटी पवार, कारभारी किसन जाधव व गावातील नवयुवक मंडळ यांचे तर्फे जंगी स्वागत व शाल श्रीफळ व पुष्पगुछ देऊन सत्कार करण्यात आले, या उपोषणाला संपूर्ण दिवस सोबत राहून सुदाम राठोड यांना सहकार्य करणारे विशाल राठोड व बळीराम मस्के यांचेही सत्कार पेदाआसापूर वासियांतर्फे करण्यात आले.

------------------------------------------

🪀 सर्व महत्त्वाच्या बातम्या मिळवा WhatsApp वर लोकनेता न्यूज ला जॉईन व्हा व शेअर करायला विसरू नका👉 https://lokneta.in/

0/Post a Comment/Comments