लोकनेता न्युज नेटवर्क
वाघोली (संतोष कदम) :- मौजे कोरेगाव भीमा ग्रामपंचायतीमध्ये दिव्यांगांसाठी राखीव असलेल्या ५% निधीमध्ये मोठ्या प्रमाणावर झालेल्या अनियमितता आणि भ्रष्टाचाराचा निषेध करण्यासाठी आज वंचित बहुजन आघाडीच्या वतीने ग्रामपंचायत कार्यालयासमोर अनोखे ‘भीक मागो’ आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाचे नेतृत्व हिरामन वाघमारे यांनी केले.
५% दिव्यांग निधीत गंभीर गैरव्यवहार
दिव्यांग नागरिकांसाठी असणार्या निधीचे योग्य वितरण न करता त्यात अफरातफर केल्याचा गंभीर आरोप ग्रामपंचायतीवर करण्यात आला आहे.
विशेषतः श्री. पंडित वारे, हे पूर्णपणे नेत्रहीन दिव्यांग असूनही—
• सन २०१८–१९ मध्ये त्यांना ५% निधीतून एकही रुपया देण्यात आला नाही,
• तसेच सन २०२४–२५ मध्येही इतर लाभार्थ्यांच्या तुलनेत अत्यल्प निधी देऊन अन्याय करण्यात आला.
२०१७–१८ ते २०२५–२६ पर्यंतच्या सर्व कामांची चौकशीची मागणी
दिव्यांग निधी वितरणासह इतर विकासकामांमध्येही अनियमितता झाल्याची माहिती पुढे येत आहे.
या पार्श्वभूमीवर २०१७–१८ ते २०२५–२६ या कालावधीतील सर्व नोंदींची सखोल व विभागीय चौकशी करावी,
आणि दोषी ग्रामसेवक व सरपंचांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी गटविकास अधिकारी, पंचायत समिती शिरूर यांना देण्यात आलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आली.
प्रशासनाला जाग आणण्यासाठी वंचित बहुजन आघाडीने हा अभिनव आणि आक्रोश व्यक्त करणारा आंदोलनात्मक पद्धतीने निषेध नोंदविला.
उपस्थित मान्यवर व कार्यकर्ते
या आंदोलनात विविध पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
हिरामन वाघमारे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात खालील मान्यवर उपस्थित होते:
अमोल गायकवाड, केतन निकाळजे, अंकुश नरवडे, दिक्षांत भालेराव, ओंकार गुंजाळ, संतोष गायकवाड, राहुल सकट, आकाश निकाळजे, पटेकर साहेब, आकाश राऊत, गोविंद कांबळे, आकाश वाघमारे, विशाल आदमाने, सागर उदागे, शरद कांबळे, प्रकाश सोनावणे, साहिल शेख तसेच वंचित बहुजन आघाडीचे अनेक पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.
------------------------------------------
🪀 सर्व महत्त्वाच्या बातम्या मिळवा WhatsApp वर लोकनेता न्यूज ला जॉईन व्हा व शेअर करायला विसरू नका👉 https://lokneta.in/

Post a Comment