लोकनेता न्युज नेटवर्क
उस्माननगर (गणेश लोखंडे) :- दरवर्षी प्रमाणे यंदाही भोपाळवाडी ता. लोहा येथील दि. १५ नोव्हेंबर ते २२ नोव्हेंबर दरम्यान श्री. विठ्ठल रुक्मिणी व श्री हनुमान मंदिर येथे अखंड हरिनाम सप्ताह व श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी सामुहिक पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
यावेळी सप्ताहातील दैनंदिन कार्यक्रम. पहाटे चार ते सहा काकड आरती, भजन , सकाळी सहा ते दहा ज्ञानेश्वरी पारायण , दहा ते बारा गाथा भजन , दुपारी दोन ते साडेतीन कलंबर बुद्रुक येथील महिला मंडळाचे भजन. सायंकाळी चार ते पाच ज्ञानेश्वरी प्रवचन , सायंकाळी पाच ते सहा हरिपाठ , व रात्री नऊ ते 11 हरिकीर्तन , रात्री अकरा ते चार हरी जागर होईल.
याप्रसंगी अखंड हरिनाम सप्ताह निमित्त दररोज रात्री नऊ वाजता कीर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे . यामध्ये दि. १५ नोव्हेंबर रोजी प्रवचनकार म्हणून ह. भ. प. शिवराज स्वामी, तर किर्तनकार म्हणून श्री. ह. भ. प. घनश्याम महाराज बेटकर (नामदेव मठ संस्थान उंम्रज) , दि. १६ नोव्हेंबर रोजी प्रवचनकार म्हणून ह. भ. प. डॉ. सौ. वर्षाताई डांगे , तर किर्तनकार म्हणून ह. भ. प. श्री. दिपक गुरूजी बोरगांवकर , दि. १७ नोव्हेंबर रोजी प्रवचनकार म्हणून श्री. ह. भ. प. अंकुश महाराज मोरे तर किर्तनकार म्हणून श्री. संत ज्ञानेश्वर महाराज समाधी सोहळ्या निमित्त गुलाल कीर्तन १० ते १२ ह. भ. प. भागवताचार्य नरसिंग महाराज केरूरकर व ९ ते ११ ह. भ. प. ह. भागवताचार्य नरसिंग महाराज केरूरकर. दि. १८ नोव्हेंबर रोजी प्रवचनकार म्हणून ह. भ. प. गजानन महाराज चिकाळकर तर किर्तनकार म्हणून श्री. ह. भ. प. रोहिदास महाराज कळकेकर ( नामदेव म. संस्थान उम्रज शिक्षक) , दि. १९ नोव्हेंबर रोजी प्रवचनकार म्हणून श्री. ह. भ. प. रोहिदास महाराज आहेरकर तर किर्तनकार म्हणून श्री. ह. भ. प. मोहन महाराज खुर्दळीकर , दि. २० नोव्हेंबर रोजी प्रवचनकार म्हणून श्री. ह. भ. प. मारोती महाराज कदम तर किर्तनकार म्हणून श्री. ह. भ. प. पंढरी महाराज हडोळीकर , दि. २१ नोव्हेंबर रोजी प्रवचनकार म्हणून श्री. ह. भ. प. बचाटे गुरूजी तर किर्तनकार म्हणून श्री. ह. भ. प. निवृत्ती महाराज ईसादकर दि. २२ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वा. श्री. ह. भ. प. रंगनाथ महाराज ताटे यांचे काल्याचे किर्तन होईल व नंतर मुरलीधर पाटील भोकरे यांच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी परिसरातील भाविकांनी अखंड हरिनाम सप्ताह व महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे समस्त गावकरी मंडळी भोपाळवाडी यांनी आवाहन केले आहे.
------------------------------------------
🪀 सर्व महत्त्वाच्या बातम्या मिळवा WhatsApp वर लोकनेता न्यूज ला जॉईन व्हा व शेअर करायला विसरू नका👉 https://lokneta.in/

Post a Comment