लोकनेता न्युज नेटवर्क
परभणी (प्रतिनिधि) :- संघर्ष योध्दा मनोज जरांगे पाटील यांच्या जिवितास असलेला धोका लक्षात घेऊन त्यांना तात्काळ झेड प्लस सुरक्षा प्रदान केली जावी, अशी मागणी अखिल भारतीय कुणबी-मराठा महासंघाचे संस्थापक अध्यक्ष गुळभिले पाटील आणि मराठवाड्यातील परभणी, नांदेड, हिंगोली जिल्हा संपर्कप्रमुख दत्तात्रय कराळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
गरजवंत मराठा समाजाला आरक्षणाचा लाभ मिळावा यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी आपले प्राण पणाला लावून राज्यभर लढा उभारला. कोट्यवधी मराठा समाज त्यांच्या नेतृत्वाखाली एकवटला. त्यांच्या त्या संघर्षमय लढ्यामुळेच अनेक गरजवंतांना कुणबी प्रमाण पत्राचा लाभ मिळाला, हे मुळीच नाकारता येणार नाही.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र शासन आणि मंत्री मंडळ उपसमिती प्रमुख मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मराठा समाजाला कुणबी प्रवर्गातून आरक्षण आणि त्यासंबंधीचे प्रमाण पत्र उपलब्ध केले जावेत यासाठी भरीव असे सहकार्य केलेले आहे. एवढेच नाही तर ओबीसी आरक्षणाला कोणताही धक्का न लागू देता हैदराबाद गॅझिटियरच्या अनुषंगाने हे आरक्षण कायद्याच्या कसोटीवर न्यायालयीन स्तरावरही टीकले जावे यासाठीचा विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी वारंवार समाजाला दिला आहे.
असं असलं तरी काही समाजविघातक प्रवृत्तीकडून मनोज जरांगे पाटील यांच्या जिवितास धोका असल्याचे प्रसार माध्यमांतून समोर आले आहे. नव्हे, तसा धोका असल्याचे सुकृत दर्शनी पुढे आल्याचेही जालना पोलिसांच्या सतर्कतेमुळे दिसून आले आहे. या वृत्तामुळे आणि पोलिसांच्या सतर्कतेमुळे संपूर्ण मराठा समाजामध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. परिणामी मनोज जरांगे पाटील यांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने स्वतः लक्ष घालून या प्रकरणाची सखोल चौकशी करावी जेणेकरून वास्तव काय आहे, हे सुध्दा समोर येऊ शकेल. तथापि जरांगे पाटील यांच्या जिवितास निर्माण झालेला धोका लक्षात घेऊन तातडीने त्यांना झेड प्लस सुरक्षा प्रदान केली जावी, अशी विनम्र मागणी अखिल भारतीय कुणबी-मराठा महासंघातर्फे करण्यात आली आहे.
------------------------------------------
🪀 सर्व महत्त्वाच्या बातम्या मिळवा WhatsApp वर लोकनेता न्यूज ला जॉईन व्हा व शेअर करायला विसरू नका👉 https://lokneta.in/

Post a Comment