तक्षशिला बहुउद्देशीय सामाजिक संस्था सणसवाडी यांच्या वतीने संविधान दिन उत्साहात साजरा


मानवाच्या जीवन कल्याणाचा महान ग्रंथ म्हणजे भारतीय संविधान - मालोजी भेदेकर.

लोकनेता न्युज नेटवर्क

वाघोली (संतोष कदम) :- संविधान दिन २६ नोव्हेंबर रोजी भारतभर साजरा केला जातो. संविधान हे २६ नोव्हेंबर १९४९ रोजी भारताच्या संविधान सभेने स्वीकारले आणि २६ जानेवारी १९५० रोजी लागु झाले. दि.२६/११/२०२५ रोजी प्रतिदीप फाउंडेशन च्या ऑफिस मध्ये संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात आला.

तक्षशिला बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष विश्वनाथ घोडके,सचिव मालोजी भेदेकर,उपाध्यक्ष मोतीराम निकुंभ,सल्लागार विष्णू इंगळे,सूरज करंकाळ, प्रतिदीप फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष प्रदीप कांबळे,तथागत बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष तात्याराम मोरे,शिवसेनेचे ज्येष्ठ नेते सतीश दरेकर यांचे हस्ते छत्रपती शिवाजी महाराज,डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे आणि भारताचे संविधान ग्रंथाचे प्रथमतः पूजन करण्यात आले.तसेच संविधानाच्या प्रस्ताविकाचे वचन करून उपस्थितांना संविधान प्रस्थाविकाची प्रत भेट देण्यात आली.यावेळी सतीश दरेकर, विश्वनाथ घोडके,मालोजी भेडेकर,प्रदीप कांबळे व तात्याराम मोरे यांनी आपल्या भाषणातून संविधानाचे महत्व विषद करून उपस्थितांना संविधान दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

 या संविधान दिन सोहळ्यासाठी प्रतिदिप फौंडेशन सर्व स्टाफ अश्विनी दुमने,प्रसन्ना घणघाव, अशा तिवारी,अमर मुळे,रोशनी तोडकर,पूजा आयवाळे,तक्षशिला बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष विश्वनाथ घोडके,सचिव मालोजी भेदेकर,उपाध्यक्ष मोतीराम निकुंभ, सह खजिनदार दिलीप जाधव,सल्लागार विष्णू इंगळे,सूरज करंकाळ,तथागत बहुउद्देशीय संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तात्याराम मोरे,प्रतिदीप फाउंडेशन चे संस्थापक अध्यक्ष प्रदीप कुलकर्णी,शिवसेनेचे नेते सतीश दरेकर, आप्पा कांबळे,विपुल घोडके,आदित्य झडते,सम्यक लोखंडे यांच्यासह अनेक समाज बांधव उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विश्वनाथ घोडके यांनी तर उपस्थितांचे आभार मालोजी भेदेकर यांनी मानले.

------------------------------------------

🪀 सर्व महत्त्वाच्या बातम्या मिळवा WhatsApp वर लोकनेता न्यूज ला जॉईन व्हा व शेअर करायला विसरू नका👉 https://lokneta.in/

0/Post a Comment/Comments