माधवराव शिंदे हेच पेठवडज येथे ग्रामविकास अधिकारी पाहिजेत ग्रामपंचायत सदस्यांची मागणी


लोकनेता न्युज नेटवर्क

पेठवडज (प्रदीप मुगावे) :- पेठवडज ता.कंधार जि नांदेड ग्रामपंचायत कार्यालयात कार्यरत असलेले माधवराव बालाजी शिंदे ग्रामविकास अधिकारी हे अत्यंत प्रामाणिक कार्यतत्पर जबाबदार अधिकारी असून त्यांनी आपल्या कारकिर्दीत ग्रामपंचायतीच्या विकासात्मक कामामध्ये प्रभावी समन्वय साधला आहे .तथापि सध्या ग्रामपंचायत कार्यालयाच्या सरपंच यांच्या इच्छेनुसार अधिकारी बदलीचा विषय निर्माण करण्यात आला असून हा हवा आणि तो नको या पद्धतीने ग्रामविकास अधिकाऱ्यांच्या बदलीचा विषय निर्माण करण्यात आला असून बदली करणे संविधान व प्रशासनाच्या तत्त्वाला धरून नाही तसेच सध्या सदर ग्रामपंचायतीचा कार्यकाळ अवघा दोन ते तीन महिनेच उरलेला आहे. अशा परिस्थितीत वारंवार अधिकारी बदलल्यास प्रशासनिक कामकाजात अडथळे निर्माण होऊन गावकऱ्यांमध्ये व ग्रामपंचायत सदस्यांमध्ये उलट सुलट चर्चांचा विषय बनत आहे. ज्याचा थेट परिणाम विकास कामांवर होत आहे .म्हणून गावकऱ्यांनी ग्रामविकास अधिकारी माधवराव बालाजी शिंदे यांच्या बदलीचा विषय स्थगित ठेवून त्यांनी विद्यमान ग्रामपंचायतीचा शिल्लक कार्यकाळ पूर्ण होईपर्यंत पेठवडज याच ठिकाणी कार्यरत राहण्यास परवानगी देण्याची मागणी धोंडीराम शंकर गडमवाड ग्रा.पं.सदस्य, साईनाथ गुंडाजी पुटवाड, विमलबाई धोंडीबा बकवाड, एकनाथ बाबुराव डावकोरे, भालचंद्र बापूसाहेब नाईक , पार्वतीबाई संभाजी डावकोरे, आनंदा मरीबा लोहबंदे,या ग्रामपंचायत सदस्यांनी व गावकऱ्यांनी मागणी केली आहे.

------------------------------------------

🪀 सर्व महत्त्वाच्या बातम्या मिळवा WhatsApp वर लोकनेता न्यूज ला जॉईन व्हा व शेअर करायला विसरू नका👉 https://lokneta.in/

0/Post a Comment/Comments