लोकनेता न्युज नेटवर्क
परभणी (दत्तात्रय कराळे) :- स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या प्रचारादरम्यान भाजप आमदार आशिष देशमुख यांनी विरोधकांना चक्क कापून काढण्याची धमकी दिलीय. त्यांच्या या धमकीपूर्ण वक्तव्यामुळे महाराष्ट्रातलं राजकारण कुठल्या थराला जातंय हे दिसून येत आहे.
कळमेश्वरच्या येथील नगरपरिषद निवडणुकांच्या प्रचारसभेत बोलताना विरोधकांना त्यांनी ही धमकी दिली.
काही दिवसापूर्वी भाजप उमेदवाराला मारहाण
राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. अवघ्या पाच दिवसांवर मतदान येऊन ठेपले आहे. मात्र कधी नव्हे तो यावेळी निवडणुकांच्या काळात महाराष्ट्राचा चक्क बिहार झालाय, असे अनेक गंभीर घटनांवरुन दिसत आहे. कुठं उमेदवारांचे अपहरण होतंय तर कुठे उमेदवारांवर हल्ले केले जात आहेत. शरद पवार राष्ट्रवादीचे बीड जिल्हाध्यक्ष राम खाडेंवर प्राणघातक हल्ला झाल्याची घटना अगदी सकाळी सकाळी घडली. हे कमी म्हणून की काय, आता नागपूर मधील भाजप आमदार आशिष देशमुख यांनी थेट कापून काढण्याची भाषा केलीय. यामुळे विरोधकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं जाणं स्वाभाविक आहे.
राज्यातील राजकारणात भूकंप होणार; राष्ट्रवादी अन् शिवसेनेच्या युतीची नांदी
कळमेश्वर नगरपरिषद निवडणुकीच्या प्रचारात बोलताना आमदार आशिष देशमुख यांनी विरोधकांना धडधडीत धमकी दिलीय. हे देवेंद्र फडणवीसांचं सरकार आहे. ते गृहमंत्री आहेत. ते नागपूरचे आहेत. त्यामुळं जास्त कराल तर कापून काढू, अशी भयाणक धमकी त्यांनी दिलीय. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या प्रचारात राजकीय नेते ऐकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत. मात्र भाजप आमदारानं थेट कापून काढण्याची धमकी दिलीय. खेदाची बाब म्हणजे त्यावेळी मंचावर राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे देखील उपस्थिती होते.
महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप होणार? महायुती फुटणार, शिंदे-पवार एकत्र येणार?
दरम्यान, दोन दिवसाआधी कळमेश्वरमध्ये काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून भाजपच्या कार्यकर्त्यांला मारहाण करण्यात आली होती. त्यात काँग्रेस उमेदवाराच्या पतीचं नाव पुढे आलं होतं. त्याला प्रतिउत्तर देताना आशिष देशमुख यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थित ही धमकी दिलीय. त्यामुळे सद्या नागपूर जिल्ह्यात आशिष देशमुख यांच्या याच भाषणाची मोठ्या प्रमाणात चर्चा होतेय.
------------------------------------------
🪀 सर्व महत्त्वाच्या बातम्या मिळवा WhatsApp वर लोकनेता न्यूज ला जॉईन व्हा व शेअर करायला विसरू नका👉 https://lokneta.in/

Post a Comment