श्री दत्त जयंती नियोजन आढावा बैठक संपन्न दिनांक २७ रोजी सहाय्यक जिल्हाधिकारी जेनीत चंद्रा दोन्तूला घेणार व्यापक बैठक.


लोकनेता न्यूज नेटवर्क

श्रीक्षेत्र माहूर (राजकिरण देशमूख) :- श्रीक्षेत्र माहूर गडावर होणाऱ्या श्री दत्त जयंती यात्रा महोत्सवानिमित्त गडावर लाखो भाविक येणार असल्याने प्रशासनाकडून दि २५ रोजी दुपारी पंचायत समितीच्या कै वसंतराव नाईक सभागृहात बैठक घेण्यात आली या बैठकीत नायब तहसीलदार तहसीलदार कैलास जेठे यांनी सर्व उपस्थित विभाग प्रमुख आणि प्रतिनिधीकडून आढावा घेत सूचना केल्या तसेच गैरहजर अधिकारी कर्मचाऱ्यांनी दि २७ रोजी येथे होणाऱ्या बैठकीस सहाय्यक जिल्हाधिकारी जेनीत चंद्रा दोन्तूला हे उपस्थित राहणार असल्याने सर्वांनी आपापल्या अहवालासह हजर राहण्याच्या सक्त सूचना केल्या 

या बैठकीस नायब तहसीलदार कैलास जेठे नायब तहसीलदार श्रीमती सूर्यवंशी,सपोनी शरद घोडके, सहाय्यक गवीअ पिडी मुरादे, उपविभागीय अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग डि. के.भिसे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ आर डी माचेवार,मराविमचे अभियंता आर बी शेंडे,वैद्यकीय अधिकारी डॉ ए डी आंबेकर,आगार प्रमुख चंद्रशेखर समर्थवाड, राष्ट्रीय महामार्गाचे क अभियंता ए जी हजारे,क अभियंता पी व्ही हंचाटे, वनपाल एन एन कत्तुलवार, जीएन नाईक,पो का गजानन जाधव, मंडळाधिकारी चंदनकर,श्री दत्त शिखर संस्थांन चे सचिव प्राचार्य डॉ गणेश पाटील, पंस चे एम एम लोणीकर,तलाठी सी पी बाबर,देव देवेश्वर संस्थानचे विश्वस्त एस एल कोथळकर, श्री रेणुका देवी संस्थानचे विश्वस्त दुर्गादास भोपी,श्री रेणुका देवी संस्थानचे व्यवस्थापक योगेश साबळे, पत्रकार विजय आमले,नंदकुमार जोशी,इलियास बावाणी,संजय घोगरे यांचे सह मान्यवर उपस्थित होते

 यावेळी नायब तहसीलदार कैलास जेठे यांनी विभाग प्रमुखांना सक्त सूचना करून दरवर्षीप्रमाणे यात्रा नियोजनात कुठलीही कसर राहणार नाही याची दक्षता घेण्याचे आवाहन केले तसेच होणाऱ्या बैठकीत सर्वांनी दरवर्षी यात्रा नियोजनाच्या आढाव्यासह उपस्थित राहून यावर्षी भाविकांना सोयी सुविधा सुरक्षा मिळावी यासाठी काय नियोजन करण्यात आले याचाही तपशील सोबत घेऊन येण्याच्या सूचना केल्या.

------------------------------------------

🪀 सर्व महत्त्वाच्या बातम्या मिळवा WhatsApp वर लोकनेता न्यूज ला जॉईन व्हा व शेअर करायला विसरू नका👉 https://lokneta.in/

0/Post a Comment/Comments