लोकनेता न्युज नेटवर्क
नांदेड (स्वाती सोनकांबळे) :- इंदिरा गांधी हायस्कूल सिडको नांदेड येथे नांदेड जिल्हा गणित अद्यापक मंडळ, नांदेड आयोजित गणित संबोध परीक्षेत इंदिरा गांधी हायस्कूल सिडको येथील इयत्ता 5 वी वर्गातील 66 व इयत्ता 8 वी वर्गातील 30 विद्यार्थी परीक्षेस बसले होते. त्यापैकी 5 वीचे 9 विद्यार्थी व 8 वीचे 8 विद्यार्थी प्रमाणपत्रास पात्र ठरले.
5 वी च्या विद्यार्थ्यांना जेष्ठ शिक्षक एम. टी. कदम, जेष्ठ शिक्षिका ए. आर. चिलकेवार, तर 8 वी च्या विद्यार्य्यांना गजले सर यांनी मार्गदर्शन केले. या सर्व विद्यार्थी व शिक्षकांना शाळेचे मुख्याध्यापक जी. एम. शिंदे सर, उपमुख्याध्यपिक वैशाली देशमुख मॅडम, पर्यवेक्षक डॉ. आण्णासाहेब गरड, रमेशजी सज्जन, यांनी प्रेरणा दिली.
या प्रसंगी प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका शिंदे मॅडम, जेष्ठ शिक्षक कल्याणकर सर,शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
------------------------------------------
🪀 सर्व महत्त्वाच्या बातम्या मिळवा WhatsApp वर लोकनेता न्यूज ला जॉईन व्हा व शेअर करायला विसरू नका👉 https://lokneta.in/

Post a Comment