लोकनेता न्युज नेटवर्क
एरंडोल (प्रतिनिधी) :- एरंडोल येथील सुप्रसिद्ध साहित्यिक, अनुवादक तथा कवी प्रा.वा. ना.आंधळे यांची कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या विचारधारा प्रशाळा व संशोधन विभागाच्या विशेष सल्लागार सदस्य पदी नियुक्ती करण्यात आली.दहा सदस्य असलेल्या या विशेष सल्लागार समितीच्या चेअरमनपदी क.ब.चौ.उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे सन्माननीय कुलगुरू महोदय हे आहेत.सदरचे नियुक्ती पत्र विचारधारा प्रशाळा व संशोधन विभागाचे प्रमुख मानवतावादी विचारवंत तथा साहित्यिक समीक्षक प्रोफेसर डॉ.म.सु. पगारे यांच्या कार्यालयाकडून प्रा.आंधळे यांना नुकतेच प्राप्त झाले असून या नियुक्तीचे त्यांच्या साहित्यिक,शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील मित्रपरिवाराकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
प्रा.वा. ना.आंधळे हे धरणगाव महाविद्यालयाच्या वरिष्ठ विभागात पस्तीस वर्षे अध्यापन करीत सन २०२१ या वर्षी सेवानिवृत्त झालेत.गेल्या चार दशकांपासून ते काव्यलेखन करीत असून चार राज्यस्तरीय साहित्य संमेलनातील कवी संमेलनाच्या तसेच सन २०२२ साली नाशिक येथे संपन्न झालेल्या राज्यस्तरीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाचा मान त्यांना मिळाला असून त्यांच्या कविता महाराष्ट्र व कर्नाटक राज्याच्या विद्यापीठीय अभ्याक्रमात तसेच गुजरात व महाराष्ट्राच्या शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट असून स्वलिखित *आई मला जन्म घेऊ दे* या स्त्री भ्रूण हत्येला पायबंद घालणाऱ्या कवितेचे इंग्रजी भाषेसह भारतीय प्रमाणभाषा व बोली भाषेसह एकूण पंचेचाळीस भाषेत अनुवाद झाले आहेत.या कवितेला मिळालेला जनाधार विक्रमी असून सात समुद्रापार जाण्याचे भाग्य या कवितेला लाभले हा केवळ खान्देशाचा गौरव नसून राज्याचा व देशाचा गौरव आहे.
भाषा प्रशाळा व विचारधारा प्रशाळा विभाग प्रमुख तथा मानवतावादी विचारवंत कवी डॉ.म.सु.पगारे यांनी मराठी भाषेतून लिहिलेले 'बा, तथागता!'या अडीचशे पानी एका कवितेचे(विशाल काव्याचे)अहिराणी बोली भाषेतून प्रा.वा. ना.आंधळे यांनी केलेले भाषांतर सध्या चर्चेत असून या विशाल कवितेवर प्रकाशित होणाऱ्या समीक्षा ग्रंथाचे संपादनही प्रा. आंधळे यांनी केलेय.सेवनिवृत्तीनंतरही त्यांची ही यशदायी वाटचाल अभिमानास्पद वाटते.त्यांच्या शैक्षणिक साहित्यिक वाटचालीस सर्वोत्तम शुभेच्छा व अभिनंदन.
------------------------------------------
🪀 सर्व महत्त्वाच्या बातम्या मिळवा WhatsApp वर लोकनेता न्यूज ला जॉईन व्हा व शेअर करायला विसरू नका👉 https://lokneta.in/

Post a Comment