लोकनेता न्युज नेटवर्क
परभणी (दत्तात्रय कराळे) :- अवघ्या पाच दिवसांवर येऊन ठेपलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अत्यंत चुरशीच्या होणे अपेक्षित असताना महायुतीमध्ये मात्र अंतर्गत कलहाला भलतेच उधाण आले आहे. भाजपा आणि शिंदे सेनेत सुरु असलेला कलगीतुरा शिगेला पोहोचला गेल्याचे दिसून येत आहे. नुकताच भाजप नेत्यांकडून कोकणात छापा टाकून सहकारी पक्षाने पकडून दिलेल्या लाखो रुपयांच्या नोटांची बॅग (व्यापारी झोला) पोलिसांच्या हवाली केल्याचा राग मनात धरुन भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केलेले स्फोटक विधान अत्यंत खळबळजनक तर आहेच, त्याशिवाय भयंकर मोठा राजकीय स्फोट घडवून देणारे असेच म्हणता येईल.
शिवसेना शिंदे गटाचे नेते निलेश राणे यांनी निवडणूकीच्या तोंडावर कोकणात वाटले जाणाऱ्या पैशांचा गंभीर आरोप भाजपाला केल्याबद्दल माध्यमांनी विचारले असता रवींद्र चव्हाण म्हणाले की, मला यावर अधिक काही न बोलता आगामी २ डिसेंबर पर्यंत महायुती कशी टिकवता येईल हे बघायचे आहे. रवींद्र चव्हाण हे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष असून ते एक जबाबदार नेते आहेत. त्यांनी केलेले ते सूचक विधान युतीअंतर्गत चालू असलेल्या भयंकर अशा घडामोडीचे द्योतक असून ते आता पूरते उफाळून आले आहे असे म्हणायला हरकत नाही.
जळगाव दौऱ्यावर असलेले रवींद्र चव्हाण यांनी सावध पवित्रा घेत निलेश राणे यांनी केलेले गंभीर आरोपही त्यांनी साफ फेटाळून लावले.
श्री.चव्हाण पुढे असेही म्हणाले की, मला २ तारखेपर्यंत युती टिकवायची असून यावर आताच काही भाष्य करणार नाही. त्यानंतरच मी सविस्तर बोलेन, असे सूचक विधान करून आगामी काळात बऱीच मोठी स्फोटक परिस्थिती निर्माण होऊन मोठा राजकीय भूकंप होईल जणू असेच चव्हाण यांच्या वक्तव्यातून दिसून आल्यास आश्चर्य वाटू नये. त्यामुळे येणारा काळ महायुतीसाठी भयंकर कठीण जाऊ शकेल असेच वाटणे स्वाभाविक आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर होण्याच्या अगोदर पासूनच महायुतीमध्ये मोठी खलबतं शिजायला सुरुवात झाली होती. एकमेकांवर गंभीर आरोपांच्या फैरी झाडत कुठे नगराध्यक्ष तर कुठे नगरसेवक पदाचे उमेदवार पळवून पक्षांतराचे महानाट्य सातत्याने सुरुच राहिले आहे. त्यामुळे बराच खल माजला गेला. परिणामी भाजपाकडून सर्व बाजूंनी होत असलेली कोंडी असह्य झाल्याने एकनाथ शिंदे यांनी वारंवार दिल्ली वाऱ्या कराव्या लागल्या. तथापि याचनांची गुहार अमीत शाह यांच्याकडून मार्गी लागली जाईल असे वाटलेल.या शिंदेंच्या मनसुब्यांना सतत पाणीच पेरले गेले. त्याचाच परिपाक म्हणून एकनाथ शिंदे यांनी सुध्दा वेगवेगळ्या क्लृप्त्या सुरु केल्याचे पुढे येत आहे. एकूणच काय तर अगोदर उध्दव ठाकरे, त्यानंतर शरद पवार आणि आता पुन्हा एकनाथ शिंदे यांची कोंडी करुन त्यांनाही राजकीय विजनवास दाखवला जातोय का राजकीय करिअर संपविले जातेय हे येणाऱ्या काळात दिसून येणारच आहे. पर्यायाने आगामी काळातील जिल्हा परिषदा व
महापालिका निवडणुकीची रणनीती काय राहील, याकडे सुध्दा अनेकांच्या भुवया उंचावल्या गेल्यास चुकीचं ठरणार नाही.
आमचा मोर्चा ठरला खरा
विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून सत्तास्थानी विराजमान होताच भाजपाने एकनाथ शिंदे यांच्या विरोधात खेळी सुरु केली होती. त्याचवेळी आम्ही *भाजपा करणार शिंदेंची राजकीय कोंडी* या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित करुन शिवसेनेला सजग राहण्याचा अनाहूत सल्ला दिला होता. तथापि कुबड्यांचा आधार घेत भाजपाने त्याच शिंदे सेनेची कुठे कोंडी तर कुठे दमकोंडी करुन राष्ट्रवादीवरही कुरघोडी चालविली होती. परंतु डावपेच खेळण्यात माहीर असलेल्या अजित पवार यांनी मोठमोठे गैरप्रकार करुन भाजपचीच जिरवण्यासाठी अनेक षडयंत्र सुरु ठेवत शेरास सव्वाशेर असल्याचे अजित पवार यांनी भाजपलाच दाखवून दिले.
------------------------------------------
🪀 सर्व महत्त्वाच्या बातम्या मिळवा WhatsApp वर लोकनेता न्यूज ला जॉईन व्हा व शेअर करायला विसरू नका👉 https://lokneta.in/

Post a Comment