लोकनेता न्युज नेटवर्क
परभणी (दत्तात्रय कराळे) :- नोज जरांगे पाटील यांच्याबाबत धक्कादायक बातमी समोर आली आहे. मनोज जरांगे यांच्या हत्येची सुपारी देण्यात आली असून त्यासाठी अडीच कोटींची सुपारी देण्यात आल्याचे सांगितले जात आहे.
मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांच्या हत्येचा कट रचल्याची धक्कादायक माहिती उघड झाली असून कोट्यवधी मराठ्यांमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे. या हत्येसाठी तब्बल अडीच कोटी रुपयांची सुपारी देण्यात आली असल्याचेही बोलले जात असून
बीडमधील एका बड्या नेत्याचा या कटात हात असल्याचा आरोप केला जात आहे.
जरांगेंचे सहकारी गंगाधर काळकुटे यांनी यासंदर्भात पोलिसांना दिले निवेदन
बीडमधील पत्रकार योगेश काशिद यांच्या वृत्ताचा हवाला देत जी काही अशाप्रकारची मोठी बातमी
बीडमधून समोर आली आहे, ती अत्यंत धक्कादायक व धोकादायक अशीच म्हणता येईल. मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी आपल्या जीवाची पर्वा करणारे मनोज जरांगे हे मागील काही कालावधी पासून शर्थीने लढा देत आहेत. प्रसंगी शासन, प्रशासन आणि सत्ताधारी व विरोधक यांच्याशीही निकराची झुंज देत आहेत. गोरं गरिबांच्या मुलांचे शैक्षणिक व नोकरी विषयक आयुष्य वाया जावू नये यासाठी ते सर्वच स्तरातून आपल्या जीवाची बाजी लावत आहेत. अशा या निश्वार्थी नेत्यासाठी आपल्या प्राणापेक्षाही अधिक जपणारे कोट्यवधी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्यासाठी छातीचा कोट करून सदैव तत्पर आहेत. अशा या निश्वार्थी मराठा नेत्याच्या जीवाला एवढा मोठा धोका निर्माण करणे म्हणजे ही शोकांतिकाच म्हणावी लागेल. मनोज जरांगे यांच्या हत्येचा कट रचण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर येणे आणि त्यांच्या हत्येसाठी अडीच कोटींची सुपारी देणे म्हणजे महाराष्ट्र आणि महाराष्ट्रातील लोकशाही नेमकी कोणत्या थराला जात आहे, यांचाही गांभीर्याने विचार होणे आवश्यक आहे. जी माहिती समोर येते आहे ती महाराष्ट्र शासनाच्या प्रतिष्ठेची बनली जाते स्वाभाविक आहे. खेदाची बाब म्हणजे बीडमधील एका बड्या नेत्याचा या कटात हात असल्याचे सांगितले जात आहे. या प्रकरणी पोलीस ठाण्यात धाव घेण्यात आली असून पोलीस पुढील तपास करत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, मनोज जरांगे पाटील यांच्या या हत्येचा कटात जे कोणी कटकारस्थान शिजवत आहेत, या संबंधीचा कुटील कट रचला जात आहे, त्यामध्ये बीडमधल्याच एका बड्या नेत्याचा यामध्ये हात असल्याचे समोर आल्याने प्रचंड खळबळ माजली आहे. मनोज जरांगे पाटलांच्या एका सहकाऱ्यासह अन्य एका व्यक्तीसोबत बीडमध्ये बैठका झाल्या होत्या. मनोज जरांगेंचे सहकारी गंगाधर काळकुटे यांनी यासंदर्भात जालना पोलीस अधीक्षकांना निवेदन दिल्याची माहिती समजते आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार दोन व्यक्तींना जालना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. यासंदर्भात स्वतः मनोज. जरांगे पाटील हे देखील जालना पोलीस अधीक्षकांना रात्री उशिरा भेटल्याची माहिती आहे.
एकूणच काय तर अंतर वाली मराठी आणि मनोज जरांगे पाटील यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून तो अत्यंत जिकिरीचा बनला गेला आहे. यावरुन राज्यातली कायदा व सुव्यवस्था किती ढासळली गेली आहे आणि ती कोणत्या थराला पोहोचली गेली आहे, हेच यातून दिसून येत आहे. शासनाने याबाबत कोणतीही हयगय न करता जे कोणी यात सामील असतील त्यांच्या तातडीने मुसक्या आवळे गरजेचे आहे. अन्यथा परिस्थिती फार चिघळली जावून कायदा व सुव्यवस्था बिघडली जाईल यात तिळमात्र शंका नसावी.
------------------------------------------
🪀 सर्व महत्त्वाच्या बातम्या मिळवा WhatsApp वर लोकनेता न्यूज ला जॉईन व्हा व शेअर करायला विसरू नका👉 https://lokneta.in/

Post a Comment