देगलूर उपविभागीय अभियंता यांच्या आश्वासनाने शेतकऱ्यांचे जलसमाधी तुर्तास मागे


लोकनेता न्यूज नेटवर्क

देगलूर (जयपाल दावनगीरकर) :- देगलूर तालुक्यातील हाळी गावच्या शेतकऱ्याने गावाच्या विकास कामासाठी शंकर बापूराव जाधव पाटील यांनी हाळी ते बेंबरा तांड्यापर्यंत सार्वजनिक बांधकाम विभागाअंतर्गत येणारा रस्ता अतिशय खराब झाला आहे. त्या रस्त्यावरून फोर व्हीलर गाड्या सोडाच पण टू व्हीलर गाड्या जाण्यास मोठी मुश्कील झालेली आहे. माणसाला चालणे तारेवरची कसरत करावी लागत आहे.

 गेल्या पाच ते सहा वर्षांपूर्वी देगलूर ते हाळी महामंडळाची बस दिवसातून दोन फेऱ्या मारत होत्या व तसेच संध्याकाळी हाळी मुक्कामी राहत असल्याने येथील लोकांना तालुक्याला ये - जा करण्यासाठी मोठी सोय होत होती, सदरील रस्ता अतिशय खराब झाला असल्याने सदरील बस बंद पडलेली आहे. 

        हाळी ते बेंबरा तांडा रस्ता मजबूती करण्यात यावे अन्य मागण्यासाठी आमरण उपोषण, जीवंत समाधी, जन संकल्प पदयात्रा अशा विविध प्रकारचे आंदोलने केलेल्या वेळी शंकर पाटील यांच्याशी समझोता काढताना सदरील रस्त्याचा टेंडर काढण्यात आला आहे.

    01 जून 25 पूर्वी काम चालू करण्याचे आश्वासने दिली होती. त्यानंतर पाळा, दसरा , दिवाळीला चालू करू असे वेळोवेळी खोटे आश्वासने संबंधित सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता निलकंठवार व गुत्तेदार अंगद मैलारे यांनी स्टमेंट झालेला आहे. वर्क ऑर्डर सुद्धा झाला आहे, असे 3 महिन्या पुर्वी सांगण्यात येते पण अद्याप रस्त्याचे काम चालू करण्यात आले नाही. काम चालू करण्यास प्रशासनाने दुर्लक्ष करीत आहेत व वेळोवेळी खोटे आश्वासन देऊन माझी दिशाभूल करीत आहेत असे शंकर बापूराव जाधव पाटील यांनी अखेर दिनांक 28 नोव्हेंबर 25 रोजी स्वतःच्या शेतातील विहिरीत जलसमाधी घेण्याचा इशारा देण्यात आला होता. काल दिनांक 27 नोव्हेंबर 25 रोजी सायंकाळी 6 वाजताच्या दरम्यान 15 फेब्रुवारी 2026 च्या महिन्या आत 0 पाँइंट पासून ते हाळी, बेंबरा तांड्यापर्यंत रस्त्याचे काम करण्याची लेखी स्वरूपात आश्वासने दिली. या आश्वासनामुळे आंदोलन कर्ते शंकर बापूराव जाधव पाटील हाळी कर यांनी तुर्तास मागे घेण्यात आले असल्याचे आंदोलनकर्ते सांगितले आहे.

------------------------------------------

🪀 सर्व महत्त्वाच्या बातम्या मिळवा WhatsApp वर लोकनेता न्यूज ला जॉईन व्हा व शेअर करायला विसरू नका👉 https://lokneta.in/

0/Post a Comment/Comments