लोकनेता न्युज नेटवर्क
कलंबर (प्रतिनिधी) :- लोहा तालुक्यातील कलंबर जिल्हा परिषद गटातुन आगामी जिल्हा परिषदेची निवडणूक लढविण्यास काँग्रेसच्या कलंबर खुर्द च्या सरपंच सौ. लताबाई गणेशराव घोरबांड या इच्छुक असुन त्यांनी काँग्रेस पक्षाकडे उमेदवारीची मागणी केली आहे.
सौ. लताबाई घोरबांड या काँग्रेसचे ज्येष्ठ सक्रिय कार्यकर्ते गणेशराव घोरबांड यांच्या अर्धांगिनी आहेत. गणेशराव घोरबांड २० ते २५ वर्षांपासून राजकीय , क्षेत्रात कार्यरत आहेत त्यांचा जनसंपर्क मोठ्या प्रमाणात आहे. त्यांनी कलंबर जि.प. गटातुन यापुर्वी ३ वेळा निवडणूक लढवली होती पण काठावर त्यांचा पराभव झाला होता.२००२ मध्ये आ.प्रतापराव पाटील चिखलीकर हे त्यावेळी कलंबर मधुन जि.प.ची निवडणूक लढविली होती त्यावेळी आ.प्रतापराव पाटील चिखलीकर यांना जोरदार टक्कर दिली होती.तसेच गणेशराव घोरबांड हे कलंबर कारखान्याचे संचालक होते त्यांच्या शैक्षणिक संस्था आहेत ते मुख्याध्यापक आहेत.ते शिवसेनेचे ८ वर्षे लोहा तालुकाप्रमुख होते. जानेवारी २०१२ पासून ते काॅग्रेस मध्ये आहेत.१३ वर्षांपासून काॅग्रेस पक्षात एकनिष्ठ असणारे ते एकमेव कार्यक्रर्ते आहेत.ते बोलले त्याप्रमाणे चालणारे कार्यक्रर्ते म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते.
गणेशराव घोरबांड यांनी तीनवेळा कलंबर जि.प.ची निवडणूक लढविली त्यांचा थोडक्यात पराभव झाला.
तरी पण गणेशराव घोरबांड हे डगमगले नाहीत त्यांनी लोकशाही मध्ये हार जीत होत राहते जनतेचा कौल स्वीकारला पुढे चालून त्यांनी त्यांच्या अर्धांगिनीला कलंबर ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत उतरुन जनतेच्या आशिर्वादाने विजय खेचून आणला व कलंबर खुर्द मध्ये मोठ्या प्रमाणात विकास कामे केली आहेत.
आता आगामी जि.प.च्या होणाऱ्या निवडणुकीत कलंबर जि.प. गट हा सर्वसाधारण खुल्या महिला प्रवर्गासाठी राखीव सुटला असल्यामुळे गणेशराव घोरबांड यांनी निवडणूकीची जोरदार तयारी केली असुन त्यांनी काँग्रेस पक्षाकडे त्यांच्या अर्धांगिनी सौ. लताबाई गणेशराव घोरबांड यांना कलंबर जि.प. गटातून उमेदवारीची मागणी केली आहे. सौ.लताबाई गणेशराव घोरबांड यांनी काँग्रेस पक्षाकडून कलंबर जि.प. गटाची उमेदवारी मागितली आहे. त्यांना प्रत्येक गावात मोठ्या प्रमाणात मतदार पाठिंबा देत आहेत.
------------------------------------------
🪀 सर्व महत्त्वाच्या बातम्या मिळवा WhatsApp वर लोकनेता न्यूज ला जॉईन व्हा व शेअर करायला विसरू नका👉 https://lokneta.in/

Post a Comment