लोकनेता न्यूज नेटवर्क
हिमायतनगर (राम चिंतलवाड) :- हिमायतनगर सार्वत्रिक नगरपंचायत निवडणुकीच्या प्रचाराला वेग येत असताना उद्या ठिक 2.30 वाजता पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांची भव्य जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. नगराध्यक्ष व नगरसेवक पदांच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ ही सभा होणार असून हिमायतनगर शहरात प्रथमच पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांची उपस्थिती असल्याने कार्यकर्ते व नागरिकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.
या सभेला पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्यासह शिवसेना स्टार प्रचारक सुभाषराव वानखेडे, विधानसभा आमदार बाबुराव कोहळीकर, शिवसेना जिल्हाप्रमुख विवेकजी देशमुख नगराध्यक्ष पदाचे उमेदवार रामभाऊ ठाकरे, तसेच सर्व नगरसेवक पदाचे उमेदवार व शिवसेना कार्यकर्त्यांची उपस्थिती राहणार आहे.
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हिमायतनगरमध्ये सुरू असलेल्या राजकीय घडामोडींना ही सभा महत्त्वाची ठरणार असून मोठ्या प्रमाणात नागरिक उपस्थित राहतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
------------------------------------------
🪀 सर्व महत्त्वाच्या बातम्या मिळवा WhatsApp वर लोकनेता न्यूज ला जॉईन व्हा व शेअर करायला विसरू नका👉 https://lokneta.in/

Post a Comment