लोकनेता न्युज नेटवर्क
भोकर (माधव नागलवड) :- भारतीय संविधानास ७५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त संविधान अमृत महोत्सव 'घर घर संविधान' १८ नोव्हेंबरच्या शासन निर्णय परिपत्रका नुसार २६ नोव्हेंबर २०२५ ते २६ जानेवारी २०२६ या कालावधीत सर्व शासकीय विभागांच्या कार्यालयात, महाविद्यालये, शाळा, वसतिगृहामध्ये विविध उपक्रमांचे आयोजन करण्याचे निर्देशित करण्यात आले आहे.
त्यानुसार भोकर तालुक्यातील रिठा येथील स्वा. सैनिक भुजंगराव पाटील किन्हाळकर मा. विद्यालय येथे संविधान दिन मोठया उत्साहात साजरा करण्यात आला सकाळी गावात प्रभात फेरी काढून शालेय विद्यार्थ्यांनी गावातील मुख्य चौकात गावाकऱ्या समोर संविधान महत्व पटवून सांगण्यासाठी पटनाथ्य सादर केले यानंतर संविधानावर आधारीत व्याख्यानमाला, चित्रकला स्पर्धा,प्रश्नमंजुषा आदी कार्यक्रम शाळेचे मुख्याध्यापक एच एन इंगळे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली घेण्यात आले.
------------------------------------------
🪀 सर्व महत्त्वाच्या बातम्या मिळवा WhatsApp वर लोकनेता न्यूज ला जॉईन व्हा व शेअर करायला विसरू नका👉 https://lokneta.in/
Post a Comment