लोकनेता न्युज नेटवर्क
उस्माननगर (प्रतिनिधी) :- उस्माननगर येथूनच जवळ आसलेल्या लोहा तालुक्यातील पोखरभोसी येथे जगाला शांतीचा संदेश देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या मुर्तीचा दुसरा वर्धापन दिन तक्षशिला बुद्ध विहार येथे दि. २७ नोव्हेंबर २०२५ रोजी गुरूवार ह्या दिवशी मंगलमय वातावरणात सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ९:००वा पंचशील ध्वजाचे ध्वजारोहण मान्यवरांच्या हस्ते होणार आहे. त्यानंतर पुज्य भंन्ते पय्यारत्न थेरो ( लेबरकाॅलनी नांदेड ), पुज्यभन्ते पय्यामोल ( लेबर काॅलनी नांदेड )यांचे परित्राण पाठ होईल व सकाळी दहा वाजता खिरदान व भिख्ख संघास भोजन दान देण्यात येणार आहे. त्यानंतर सकाळी आकरा वाजता श्रीहरी मुळे मुख्याध्यापक ( जि.प. प्रा.शाळा पोखरभोसी ), विशाल महाबळे सहशिक्षक ( जि.प. प्रा.शाळा पोखरभोसी ) व आंबेडकर चळवळीचे गाढे अभ्यासक संतोष आगबोटे यांचे मार्गदर्शन लाभणार आहे.
दुपारी बारा वाजता उपस्थित पुज्य भदन्त हे बौद्ध अनुयायांना धम्मदेशना देणार आहेत त्यानंतर दुपारी चार ते सायंकाळी सात वाजेपर्यंत भोजनदानाचा कार्यक्रम आयोजित केला आहे. व रात्री आठ वाजता महाराष्ट्राच्या सुप्रसिद्ध गायीका दिपालीताई कांबळे लातूरकर व महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध गायक सुमेध एडके जा.शिवणीकर यांचा बुद्ध, भिम गितांचा दणदणीत कार्यक्रम होणार आहे.तरी परिसरातील बौद्ध अनुयायी, भीमसैनिक ,समाज बांधवांनी उपस्थित रहावे आसे आवाहन आयु.नंदाबाई गंगाधर कांबळे ( कमिटीच्या अध्यक्षा ), आयु.आम्रपाली दयानंद कांबळे (उपाध्यक्षा ),आयु. राज्याबाई गणेश वाघमारे (सचिव ) व पोखरभोसी येथील बौद्ध उपासक,उपासिका ,तक्षशिला महिला मंडळ व समस्त गावकरी मंडळी पोखरभोसी यांनी आवाहन केले आहे.
------------------------------------------
🪀 सर्व महत्त्वाच्या बातम्या मिळवा WhatsApp वर लोकनेता न्यूज ला जॉईन व्हा व शेअर करायला विसरू नका👉 https://lokneta.in/

Post a Comment