दिलीप ठाकूर यांच्या पुढाकारातून सतत आठव्या वर्षी संतबाबा बलविंदरसिंघजींच्या शुभ हस्ते ब्लॅकेट वाटप




लोकनेता न्युज नेटवर्क

नांदेड (बाजीराव पाटील) :- रस्त्यावर कुडकुडत झोपणाऱ्या निराधारांना आधार देण्यासाठी धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर यांच्या पुढाकारातून राबविण्यात येणाऱ्या “मायेची ऊब” या २०२6 ब्लॅंकेट वाटप उपक्रमाचा शुभारंभ नांदेडभूषण संतबाबा बलविंदरसिंघजी, भाजपा महानगराध्यक्ष अमर राजूरकर, लायन्स उपप्रांतपाल राहुल औसेकर आणि योगेश जायस्वाल यांच्या शुभहस्ते मोठ्या उत्साहात संपन्न झाला. आगामी चाळीस दिवस दररोज मध्यरात्री नांदेड शहरातील विविध रस्त्यावर फिरून गरजूंना ब्लॅंकेटचे वितरण केले जाणार आहे.

भाजपा महानगर नांदेड, लायन्स क्लब नांदेड सेंट्रल, अमरनाथ यात्री संघ व सन्मित्र फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने नगीनाघाट येथे रथपूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. संयोजक ॲड. दिलीप ठाकूर यांनी प्रास्ताविकातून या उपक्रमामागची सामाजिक प्रेरणा स्पष्ट केली.संतबाबा बलविंदरसिंघजी यांनी आपल्या मनोगतात, “दिलीप ठाकूर हे सातत्याने निरपेक्ष भावनेने समाजातील वंचितांसाठी कार्य करतात,” अशा शब्दांत कौतुक केले.

राजेशसिंह ठाकूर यांनी सांगितले की, यावर्षीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी आणखी 886 ब्लॅंकेटची आवश्यकता आहे. दानशूर नागरिकांनी सढळ हाताने मदत करावी, असे त्यांनी आवाहन केले.पहिल्या दिवशी दोन सत्रात अडीचशे गरजूंना ब्लॅंकेटचे वाटप करण्यात आले.यावेळी विजय येवनकर, किशोर यादव, साहेबराव गायकवाड, आशिष नेरलकर, लतादीदी जायस्वाल,डॉ. शितल भालके, शततारका पांढरे, महादेवी मठपती, ज्योती कल्याणकर, अर्पणा चितळे, मीना भोसले, लक्ष्मी वाघमारे, तौसिफ अहमद ,गौरव कोडगिरे, राज यादव, अशोक पडगीलवार,गोपाळ पवार,सविता जम्पलवाड ,बालाजी मोरलवार,गोविंद कन्नडकर, विशाल भद्रे आदी मान्यवर उपस्थित होते.सुरेश लोट,अरुण काबरा,, सुरेश शर्मा, जयश्री ठाकूर, सविता काबरा यांनी मोत्याची माळ अर्पण करून मान्यवरांचे स्वागत केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवा लोट यांनी तर आभार सुरेश निल्लावार यांनी मानले.

दानशूरांची यादी

प्रमोद हिबारे, ॲड. दिलीप ठाकूर, रूपेश वट्टमवार, सीतारामजी जाजु, अशोक पडगीलवार, स्नेहलता जायस्वाल, अशोक गंजेवार, शशिकांत देशपांडे, अंकीता मुत्तेपवार, डॉ. राजेंद्र मुंदडा, मोहित व रेणुका सोनी, प्रा. प्रभाकर उदगीरे, सतीश सुगनचंदजी शर्मा, डी.एच. अग्रवाल, नारायण गायकवाड , अज्ञात दाता, अविनाश चिंतावार, अबिरा गौरी राहुल पवार, साईनाथ पदमवार, संजय खुपसे, कैलाश झंवर, सौ. गयाबाई कदम, सोनाली वारले, शिवराज विंचूरकर, विश्वेश्वर नांदेडकर, तिरुपती कल्याण, सुधाकर जबडे, प्रा. एस.एस. झंपलवाड, हरिसिंह चव्हाण, डॉ. भगवान केंद्रे, सौ. अलका मिलिंद पेकमवार, प्राचार्य सुधीर शिवणीकर यांनी ब्लॅंकेटसाठी देणगी दिली आहे.

सुरेश शर्मा, जगतसिंह ठाकूर, कामाजी सरोदे,संतोष भारती, दिगंबर रूमने, रोहन यादव, भोला धुमाळ, जनार्धन वाकोडीकर,अंकित शर्मा, कपिल यादव, कैलास बरंडवाल, दत्ता पाटील,संगिता यादव यांनी उपक्रमासाठी विशेष परिश्रम घेतले.“मायेची ऊब” उपक्रम सात वर्षांपासून सातत्याने राबविण्यामुळे नांदेड शहरात थंडीमुळे निराधारांचा मृत्यू झाल्याची एकही घटना घडलेली नाही. त्यामुळे ॲड. दिलीप ठाकूर व त्यांच्या टीमचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

------------------------------------------

🪀 सर्व महत्त्वाच्या बातम्या मिळवा WhatsApp वर लोकनेता न्यूज ला जॉईन व्हा व शेअर करायला विसरू नका👉 https://lokneta.in/

0/Post a Comment/Comments