विरोधकांना दादागिरी करून मतं मागणे हा काहींचा धंदा. देगलूरच्या बिजेपी जनसंवाद सभेत खा. चव्हाण यांचा आ. चिखलीकरांना टोला


लोकनेता न्युज नेटवर्क

देगलूर (अमोल कुमार शिंदे) :- नकारात्मक राजकारणातून शिव्या देत मतं मागायचे हा काही जणांचा धंदा झाला आहे, असा टोला भाजप खा. अशोकराव चव्हाण यांनी नामोल्लेख टाळत आ. चिखलीकरांना लगावला. सोबतच अभी तो सुरूवात है, तुम्ही किती विकासाच्या मार्गावर निवडणूकीत उतरता हेही मी पाहतो, असे आव्हानही खा. चव्हाण यांनी विरोधकांना दिले. तर खासदार अजित गोपछेडे यांनी पण एक जुगार खेळणारा..? तर दुसरा दादागिरी करणारा..? असे विरोधकांना टोला दिले आहे.

देगलूर शहरातील मोंढा बाजारपेठेत भाजपची जन संवाद सभा सोमवारी ३ नोव्हेबर रोजी झाली. या सभेत ते बोलत होते. गेल्या काही दिवसांपासून महायुतीमधील राष्ट्रवादीचे आ. प्रताप पाटील चिखलीकर, शिवसेनेचे विधान परिषद आ. हेमंत पाटील यांच्याकडून खा. चव्हाणांवर टिका टिप्पनी होत आहे. याचाच समाचार या सभेत खा. चव्हाण यांनी घेतला. यावेळी पुढे बोलतांना खा. अशोकराव चव्हाण म्हणाले, नकारात्मक राजकारणातून नांदेड जिल्ह्याचे विकास खुंटला जाणार आहे. माझं नाव शंभर वेळा घेऊन जप करण्यापेक्षा तुम्ही काय विकास केला हे जनतेला सांगावे. मी आजपर्यंत विकासात्मक कामे केली आहेत. विमानसेवा नांदेड येथून चालू झाली, वंदे भारत सुरू झाली आहे. प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत १६ हजार घरें पुर्ण झाले असून जवळपास वीस लाख घरांचे नियोजन चालू आहे. पंतप्रधान मोदी यांनी खूप काही महत्त्वाचे काम केली. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नांदेड जिल्हा बँकेतील नोकर भरती घोटाळ्याला ब्रेक लावून भरती एजन्सीने मार्फत गुणवत्तेवर आधारित ऑनलाईन भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे आता लोक दिलले पैसे वापस मागणी करत आहेत. जिल्हा बँकेची परिस्थिती खूप वाईट झाली आहे, मी त्या वेळी राज्याचा प्रमुख म्हणून १०० कोटी रुपये दिल म्हणून आज बँक चालू आहे, असे सांगतीले. तर आर्थिक अडचण असताना सुद्धा या सरकारने ३० हजार कोटी रुपये पॅकेज शेतकऱ्यांना दिले आहे. परंतू काही लोकं चुकीची अफवा पसरवून वातावरण खराव करत आहेत. सरकार खंबीरपणे प्रत्येक अडचणीवर मात कशी करायची ते नियोजन करत आहे, राजकारण न करता शेतकरयांना न्याय मिळेल. त्यामुळे किती दिवस आपण त्यांच्या भुलथापांना बळी न पडता विकासाच्या आड येणाऱ्या अशा लोकांना उखडून फेकून द्या आणि विकासासाठी भाजपकडे एक हात्ती सत्ता द्या, असे आवाहन केले.

जितेश अंतापूरकर यांनी पण असं म्हणाले की जिल्ह्याचे व आपल्या आन-बान शान आमचे दैवत खासदार अशोकरावजी चव्हाण साहेब व खासदार अजित गोपछेडे साहेब यांच्या नेतृत्वाखाली निश्चितपणे या भागाचा विकास होणार हा जनतेला याठिकाणी विश्वास आहे.

भारतीय जनता पार्टीच्या सरकारला सांगून या ठिकाणी देगलूर येथे लॉजिस्टिक हब या ठिकाणी मंजूर झालेला आहे. लवकरच आपल्या भागातील हा तरुण बांधव यापुढे हा कुठल्याही शहरांमध्ये मोठ्या शहराकडे वळणार नाही. याची निश्चितपणे आम्ही या ठिकाणी दखल घेतोय...?

अशोकराव चव्हाण साहेब सार्वजनिक बांधकाम मंत्री असताना आपल्या भागामध्ये २०८ कोटीची कामे रस्त्यांची काम या ठिकाणी दिली होती. रस्त्याचे देखील विषय होऊन जातील. 

 मी आपल्याला सांगू इच्छितो मागच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये देगलूर शहरातून पाचशेची लीड आहे. आपल्या भारतीय जनता पार्टीला प्राप्त झालेल्या विधानसभेमधून भारतीय जनता पार्टी म्हणून त्या ठिकाणी जवळपास 45000 च्या वर मतदारसंघाचे मायबाप जनतेने आशीर्वाद निवडून दिले त्यांच्या कायमस्वरूपी सेवेत आहे.

नगरपालिका आणि माझ्या विधानसभा मतदारसंघाचे नऊ जिल्हा परिषद आणि 18 पंचायत समिती गट हे निश्चितपणे बहुमताने निवडून येतील मी या ठिकाणी आशा व्यक्त करतो जितेश अंतापूरकर यांनी असं वक्तव्य केले.

------------------------------------------

🪀 सर्व महत्त्वाच्या बातम्या मिळवा WhatsApp वर लोकनेता न्यूज ला जॉईन व्हा व शेअर करायला विसरू नका👉 https://lokneta.in/

0/Post a Comment/Comments