लोकनेता न्युज नेटवर्क
मोखाडा (संतोष सोनकांबळे) :- संविधान गौरव दिनानिमित्त गिरीवासी सेवा मंडळ, कल्याण संचलित मुरलीधर नानाजी मोहिते गुरुजी वरिष्ठ महाविद्यालय व मातोश्री यशोदाबाई मुरलीधर मोहिते कनिष्ठ महाविद्यालय तसेच भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर विधी महाविद्यालय खोडाळा या शिक्षण संकुलात संविधान दिनाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. या चर्चासत्रात विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवून संविधानाचा जागर केला.
पहेलगाम आणि नुकतीच दिल्ली येथे घडलेली दहशतवादी घटना संविधान निर्माते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची अनेक जाती धर्मांच्या सर्वसामान्य जनतेच्या विकासाची स्वप्ने, देशातील लोकशाही आणि या लोकशाहीचा आत्मा असलेल्या संविधानाला घातक असल्याचे प्रतिपादन विकसित भारताचे दूत, साहित्यिक, कवी आणि लेखक सुभाष सोनकांबळे यांनी खोडाळा जोगलवाडी येथील मोहिते महाविद्यालयात संविधान दिनानिमित्ताने केले.
मोखाडा तालुक्यातील मोहिते महाविद्यालय जोगलवाडी खोडाळा येथे आज संविधान दिनाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी सुभाष सोनकांबळे हे प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. यावेळी व्यासपीठावर महाविद्यालयाचे प्राचार्य अनिल पाटील , प्राचार्य प्रवर्तन काशीद, प्राचार्य नुपूर पवार, शोध पत्रकार ज्ञानेश्वर पालवे, नामदेव ठोंबरे, तुकाराम रोकडे, सचिव दीपक कडलक आदी मान्यवर उपस्थित होते.
26/ 11च्या मुंबईवरील भ्याड हल्यात शहीद झालेल्या वीर हुतात्म्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करीत सुभाष सोनकांबळे यांनी पुढे बोलताना सांगितले की, झेनजीच्या नावाने भारताच्या शेजारील नेपाळ, बांगलादेश आणि श्रीलंका या राष्ट्रांत घातलेला अस्थिर उच्छाद भारतासारख्या राष्ट्राला आणि येथील सामाजिक एकतेला घातक आहे, याचा वेळीच पाय बंद घालण्याची आवश्यकता असल्याचे सुभाष सोनकांबळे यांनी सांगितले. त्यानंतर पत्रकार ज्ञानेश्वर पालवे यांनी संविधानाच्या अक्षरांची फोड करीत संविधानाचे महत्व पटवून देत संविधान कसे महत्वाचे आहे हे आपल्या मार्गदर्शनपर भाषणातून सांगितले. त्यानंतर महाविद्यालयाचे प्राचार्य अनिल पाटील यांनी सांगितले की, महाविद्यालयीन युवांनी संविधानातील मूल्यांचा अंगीकार करत स्वतःसोबत आपल्या देशाचा विकास साधावा.तसेच विधी कॉलेजच्या प्राचार्य नुपूर पवारांनी घटना त्याचे मूल्य, कर्तव्य आणि जबाबदारी या गोष्टींची माहिती यावेळी त्यांनी विध्यर्थ्यांना दिली तत्पूर्वी मोहिते महाविद्यालयातील विधी कॉलेजच्यावतीने संविधानावर भाषण स्पर्धेचे आयोजन केले होते. त्यात विद्यार्थ्यांनी आपल्या भाषणामध्ये संविधानिक मूल्य, आपले अधिकार व कर्तव्याची जाणीव करत आजचा संविधान दिन यशस्वी पार पाडला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक नितेश कोरडा यांनी केले तर आभारप्रदर्शन मोहिते महाविद्यालयचे सचिव दीपक कडलक सर यांनी केले.
------------------------------------------
🪀 सर्व महत्त्वाच्या बातम्या मिळवा WhatsApp वर लोकनेता न्यूज ला जॉईन व्हा व शेअर करायला विसरू नका👉 https://lokneta.in/

Post a Comment